शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

लातूर महानगरपालिकेला कोंडवाड्यासाठी जागा मिळेना!

By हणमंत गायकवाड | Published: August 31, 2023 7:05 PM

पशुधनाला पकडण्याची अन् दंड ठोठावण्याची कारवाई नाही

लातूर : महानगरपालिकेकडे कोंडवाडा नसल्यामुळे मोकाट पशुधन पालकांचे फावत असून, रस्त्यावर जनावरांना सोडून ते मोकळे होत आहेत. इकडे रस्त्यावर या पशुधनाचा ठिय्या असतो. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर जागोजागी ठिय्या असल्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत.

लातूर शहरातील बार्शी रोड, औसा रोड, नांदेड रोड, अंबाजोगाई रोड तसेच शहरातील अंतर्गत रस्त्यांवर वर्दळीच्या ठिकाणी भर चौकामध्ये पशुधन थांबलेले असतात. त्यांच्यापासून वाहन काढताना कसरत करावी लागते. किती हॉर्न केला तरी रस्त्यावरून जनावरे हटता हटत नाहीत. अनेकदा अपघात झाले आहेत. केवळ महानगरपालिकेकडून पशुधन पालकांवर कारवाई केली जात नसल्यामुळे मोकाट पशुधन पालक सोकावले आहेत.

पशुधनाला कोंडवाड्यात टाकण्याचा असा आहे नियम...पशुधनाला मोकाट सोडून दिल्यास प्रत्येकी तीन हजार रुपयांचा दंड आहे. सात दिवस कोंडवाड्यात पशुधन राहिल्यास हा दंड ठोठावला जातो. चारा-पाण्यासाठी दिवसाला एका जनावरासाठी पाचशे रुपये पशुधन मालकाकडून घेतले जातात. सात दिवस उलटून जर पशुमालक पशुधनाला घेण्यासाठी नाही आल्यास किंवा ओळख न पटवल्यास फुकटात पशुधन सांभाळणाऱ्याला दिले जाते. किंवा गोशाळेला दिले जाते. हा महानगरपालिकेचा नियम आहे. परंतु या नियमाप्रमाणे गेल्या अनेक दिवसांपासून कारवाई झाली नाही.

कोंडवाड्यासाठी घेतला जातोय जागेचा शोध....मोकाट पशुधनाला कोंडवाड्यात घालण्यासाठी आणि संबंधित मालकाला दंड ठोकण्यासाठी जनावरे पकडण्याचीच कारवाई नाही. कारण, कोंडवाड्यासाठी मनपाकडे जागा नाही. एका खासगी गोशाळेकडे पशुधन दिले जात होते. परंतु महापालिकेने त्यांच्याकडेही व्यवहार चांगला ठेवला नाही. त्यामुळे मोकाट पशुधन सोडणार यांचे फावत आहे. दरम्यान, मनपाच्या पशुसंवर्धन विभागाकडून कोंडवाड्यासाठी जागेचा शोध घेतला जात आहे. परंतु त्यांना जागा मिळत नाही, अशी परिस्थिती आहे.

फुकटातही गोशाळा घ्यायला तयार नाही....सात दिवस उलटून पशुधन घेण्यास पशुमालक नाही आला तर फुकटात जनावरे गोशाळेला किंवा सांभाळणाऱ्याला देण्याचे प्रयोजन आहे. परंतु फुकटातही गोशाळा घेत नाही. ही वस्तुस्थिती असल्याचे पशुसंवर्धन विभागातून सांगण्यात आले. त्यामुळे कारवाई केली जात नाही. इकडे वाहनधारकांना ठिय्या मांडलेल्या जनावरांचा त्रास होत आहे. मात्र, मनपाकडून यावर उपाययोजना सध्या तरी नाहीत.

टॅग्स :laturलातूरMuncipal Corporationनगर पालिका