शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

लातूर नगर पथविक्रेता समिती कागदावरच; वर्षभरापासून बैठकच नाही!

By हणमंत गायकवाड | Published: August 11, 2023 7:03 PM

गेल्या १४ महिन्यांपासून या समितीची बैठकच झालेली नाही. त्यामुळे फेरीवाला धोरण शहरात आहे की नाही, असा प्रश्न पथविक्रेत्यांना पडला आहे.

लातूर : महापालिकेंतर्गत २९१३ नोंदणीकृत नगर पथविक्रेत्यांची संख्या आहे. त्यांना उपजीविकेसाठी शहरात व्यवसाय करता यावा म्हणून परवानाही देण्यात आला आहे. शिवाय, शासनाकडूनही फेरीवाला धोरण आखले जाते. त्यानुसार लातूर महानगरपालिकेत नगर पथविक्रेता धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी समिती स्थापित आहे. मात्र, गेल्या १४ महिन्यांपासून या समितीची बैठकच झालेली नाही. त्यामुळे फेरीवाला धोरण शहरात आहे की नाही, असा प्रश्न पथविक्रेत्यांना पडला आहे.

महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक येथे पथविक्रेत्यांसाठी कार्यक्रम घेऊन अनेकांची नोंदणी करून घेण्यात आली होती. स्मार्टकार्ड आणि ओळखपत्रांचेही वितरण केले होते. ९० टक्के पथविक्रेत्यांनी शुल्क भरून परवाना घेतला. शिवाय, नोंदणीही केली होती. मात्र समितीची बैठक झालेली नाही. १ जून २०२२ रोजी नगर पथविक्रेता समितीची बैठक झाली. तत्कालीन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली होती. त्यानंतर बैठक झाली नसल्याचे समितीचे सदस्य त्रिंबक स्वामी यांनी सांगितले.

आयुक्त असतात समितीचे अध्यक्षनगर पथविक्रेता समितीचे अध्यक्ष मनपा आयुक्त असतात. समितीमध्ये शासकीय सदस्य म्हणून पोलिस अधीक्षक, पोलिस उपअधीक्षक वाहतूक शाखा, नगर अभियंता मनपा, आरोग्य अधिकारी मनपा तसेच उपायुक्त यांचा समावेश असतो. तर अशासकीय सदस्यांमध्ये फेरीवाल्यांचे प्रतिनिधी म्हणून समाजातील व्यक्ती असतात. अशासकीय १७ सदस्य या समितीत आहेत. मात्र, गेल्या १४ महिन्यांपासून समितीची बैठक झालेली नाही.

समिती धोरण ठरविते...राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत नगर पथविक्रेता समिती फेरीवाल्यांच्या अनुषंगाने धोरण ठरवत असते. परंतु, गेल्या १४ महिन्यांपासून बैठकच झाली नसल्यामुळे समिती कागदावरच आहे. त्यामुळे धोरण ठरविण्याचा विषयच पुढे आला नसल्याचे समिती सदस्य त्रिंबक स्वामी यांनी सांगितले.

फेरीवाल्यांसाठी मासिक शुल्क किती?मनपा हद्दीतील फेरीवाल्यांकडून मासिक भाडे ५०० रुपये घ्यावे, असा ठराव मनपाच्या सर्वसाधारण सभेत २ मार्च २०२२ रोजी करण्यात आला होता. परंतु, त्याऐवजी १०० रुपये मासिक भाडे घेण्याचा ठराव करण्यात आला. सद्यस्थितीत क्षेत्रीय कार्यालयाकडून ५०० रुपये घेतले जात असल्याच्या तक्रारी फेरीवाल्यांच्या आहेत. त्याऐवजी १०० रुपये मासिक भाडे घ्यावे, अशी मागणी फेरीवाल्यांची आहे.

विभागनिहाय फेरीवालेक्षेत्रीय कार्यालय ए ३४०क्षेत्रीय कार्यालय बी ५४०क्षेत्रीय कार्यालय सी ५५४क्षेत्रीय कार्यालय डी ३३५

टॅग्स :laturलातूरMuncipal Corporationनगर पालिका