शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
3
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
4
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
5
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
6
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
7
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
8
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
9
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
10
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
11
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या
12
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
13
अभिजीत बिचुकले बिग बॉसच्या घरात, संतापून म्हणाले, 'काहीही फो़डू शकतो...'; अंकिताची दाखवली 'ही' चूक
14
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
15
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
16
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
17
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
18
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
19
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
20
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर

Latur: काेयता घेऊन फिरणाऱ्यांची पाेलिसांनी काढली वरात, एकाला अटक

By राजकुमार जोंधळे | Published: March 17, 2024 11:34 PM

Latur News: लातूर शहरातील बार्शी राेडवर एका पेट्राेल पंपासमाेर काेयता, कत्तीचा धाक दाखवून खंडणी उकळणाऱ्या, वाहनाची तोडफोड करणाऱ्या दाेघांपैकी एकाला पाेलिसांनी अटक केली. दरम्यान, ताेडफाेड, काेयत्याचा धाक दाखवत दहशत निर्माण केलेल्या भागात पाेलिसांनी आराेपीची वरात काढली.

- राजकुमार जाेंधळे लातूर - शहरातील बार्शी राेडवर एका पेट्राेल पंपासमाेर काेयता, कत्तीचा धाक दाखवून खंडणी उकळणाऱ्या, वाहनाची तोडफोड करणाऱ्या दाेघांपैकी एकाला पाेलिसांनी अटक केली. दरम्यान, ताेडफाेड, काेयत्याचा धाक दाखवत दहशत निर्माण केलेल्या भागात पाेलिसांनी आराेपीची वरात काढली. या वरातीचा व्हिडीओ साेशल मीडियात व्हायरल झाल्याने टवाळखाेरांचे धाबे दणाणले आहेत.

पाेलिसांनी सांगितले, लातुरातील बार्शी राेडवरील एका पेट्रोल पंप परिसरात दोघांनी हातात काेयता, कत्ती घेऊन रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्या लोकांना धमकावत गाड्यांची तोडफोड केली शिवाय, नागरिकांचे मोबाइल जबरदस्तीने हिसकावले. भाजी विक्रेत्यांना कत्तीचा धाक दाखवून खंडणी वसूल केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनेनंतर दुचाकीवरून आराेपी पसार झाले. वर्णन, चेहरापट्टीच्या आधारे पाेलिसांना आराेपींचा सुगावा लागला. लातुरातील मध्यवर्ती बसस्थानकात आराेपी लपून बसल्याची माहिती मिळाली. तोहिद अकबर पठाण (वय २१, रा. वीर हनुमंतवाडी, लातूर) याला दोन मोबाइल, दुचाकी आणि कत्तीसह अटक केली. त्याचा साथीदार वैभव ऊर्फ मोन्या शिवराज बनसोडे (रा. पटेलनगर, लातूर) हा पसार झाला. पाेलिसांनी आराेपीची वरात काढत धडा शिकविला.

ही कारवाई पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे, अप्पर पाेलिस अधीक्षक डाॅ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, एमआयडीसी ठाण्याचे पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे, सपोनि. देवकते, पोउपनि. श्रीकांत मोरे, राष्ट्रपाल लोखंडे, सपोउपनि. सूरज जगताप, खुर्रम काझी, यशपाल कांबळे, भोसले, प्रशांत ओगले, योगेश चिंचोलीकर, तुरे यांच्या पथकाने केली.

हे आहेत चार ठाण्यांच्या रेकाॅर्डवरील सराईत गुन्हेगार...अटकेतील आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविराेधात लातुरातील शिवाजीनगर, गांधी चौक, एमआयडीसी आणि विवेकानंद चौक पाेलिस ठाण्यात जबरी चोरी, मारामारी, दरोडा टाकण्याचा प्रयत्न करताना दुखापत करणे, आदी गंभीर स्वरूपाचे एकूण पाच गुन्हे दाखल आहेत; तर गुन्ह्यातील फरार वैभव ऊर्फ मोन्या शिवराज बनसोडे यांच्या मागावर पाेलिस आहेत. त्यालाही लवकरच अटक केली जाणार आहे. - साहेबराव नरवाडे, पाेलिस निरीक्षक, लातूर

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर