शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

Latur: तीन हजार कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याची प्रतीक्षा! लातुरातील एसटी कर्मचाऱ्यांना वाढीव भत्त्याचा हाेणार लाभ

By राजकुमार जोंधळे | Published: June 18, 2023 4:23 PM

Latur: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना येत्या १ जुलैपासून मिळणाऱ्या महागाई भत्त्याचा दर ३४ टक्क्यांवरून ३८ टक्के करण्यात आला आहे. याबाबतचा निर्णय राज्य शासनाने जाहीर केला आहे.

- राजकुमार जाेंधळे

लातूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना येत्या १ जुलैपासून मिळणाऱ्या महागाई भत्त्याचा दर ३४ टक्क्यांवरून ३८ टक्के करण्यात आला आहे. याबाबतचा निर्णय राज्य शासनाने जाहीर केला आहे. लातूर विभागातील एकूण पाच आगरांमध्ये कार्यरत असलेल्या तीन हजार कर्मचाऱ्यांना या वाढीव महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे.

शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर जानेवारी २०२४ मध्ये हाती पडणाऱ्या वेतनामध्ये ही संपूर्ण थकबाकी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, निर्णयानंतर तातडीने अंमलबजावणी केली जात नसल्याने महामंडळाच्या कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची नाराजी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सध्या फक्त ३४ टक्के महागाई भत्ता दिला जात असून, यापूर्वी सहा टप्प्यांमध्ये वाढविण्यात आलेल्या महागाई भत्त्याच्या थकबाकीचीही रक्कम पदरी पडली नाही. परिणामी, या थकबाकीची एसटी कर्मचाऱ्यांना आजही प्रतीक्षाच दिसून येत आहे. एसटी महामंडळाच्या अमृत महोत्सवी वर्धापनदिनानिमित्त तरी जाहीर करण्यात आलेला महागाई भत्ता देण्याबाबत शासन स्तरावर हलचालींना गती देण्यात यावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांतून हाेत आहे.

लातूर विभागातील आगारांत तीन हजार कर्मचारी संख्या...महामंडळाच्या लातूर विभागातील लातूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा आणि औसा आगारात जवळपास तीन हजार अधिकारी, चालक, वाहक आणि इतर, अशी कर्मचाऱ्यांची संख्या आहे. तर ५०० च्या घरात एसटी बसेसची संख्या असून, सध्या महामंडळाची लालपरी फायद्यात आहे. दैनंदिन प्रवासी भारमान वाढल्याने आर्थिक उत्पन्नाचा आकडा वाढला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा थकीत महागाई भत्ता...१) जुलै ते सप्टेंबर २०१८ या काळातील २ टक्क्यांची तीन महिन्यांची थकबाकी थकली आहे.२) जानेवारी ते सप्टेंबर २०१९ या काळातील ३ टक्क्यांची ९ महिन्यांची थकबाकी३) जुलै २०१९ ते जून २०२१ या काळातील ५ टक्क्यांची २४ महिन्यांची थकबाकी४) जुलै ते सप्टेंबर २०२१ या काळातील ११ टक्क्यांची तीन महिन्यांची थकबाकी५) ऑक्टाेबर ते डिसेंबर २०२१ या काळातील ३ टक्क्यांची तीन महिन्यांची थकबाकी६) जानेवारी ते ऑक्टाेबर २०२२ या काळातील ३ टक्क्यांची १० महिन्यांची थकबाकी थकली आहे.

टॅग्स :ashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022Pandharpur Wariपंढरपूर वारी