शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
2
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
3
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
4
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
5
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
6
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
7
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
8
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
9
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
10
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
11
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
12
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
13
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
14
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
15
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
16
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
17
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
18
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
19
...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य
20
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 

लातूर ते पंढरपूर, शिखर शिंगणापूर ५०० रुपयांत! देवदर्शनासाठी महिलांसाठी स्पेशल बस

By हणमंत गायकवाड | Published: August 09, 2023 3:20 PM

लातूर आगाराने हा उपक्रम अधिक मास आणि श्रावणानिमित्त सुरू केला आहे.

लातूर : अधिक मास आणि श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर एस. टी. महामंडळाच्या लातूर आगाराने महिलांना देवदर्शनासाठी खास यात्रा स्पेशल बसची सोय केली आहे. लातूर ते पुरुषोत्तमपुरी, औंढा नागनाथ, परळी, परत लातूर आणि लातूर ते पंढरपूर, शिखर शिंगणापूर देवदर्शनासाठी बसेस सोडल्या जाणार आहेत. ४३ महिला प्रवासी भेटल्यानंतर पाचशे रुपयांत या दोन मार्गावर ट्रीप केली जाणार आहे. 

पाचशे रुपयात येणे-जाणे असणार आहे. लातूर आगाराने हा उपक्रम अधिक मास आणि श्रावणानिमित्त सुरू केला आहे. पंढरपूरला एक ट्रीप झाली असून, येणाऱ्या बुधवारी शिखर शिंगणापूरला दुसरी ट्रीप होणार आहे. महामंडळाच्या या उपक्रमामुळे महिलांना देवदर्शनाची सोय उपलब्ध झाली आहे. एकत्रित येऊन महिला लातूर ते पुरुषोत्तम पुरी, औंढा नागनाथ, परळीसाठी तसेच लातूर ते पंढरपूर शिखर शिंगणापूर अशी ट्रीप आयोजित करत असतील तर संपर्क साधावा.

एकत्र येऊन मागणी केली तर बस सोडणार दोन मार्गांसाठी सर्वसाधारण हजार ते बाराशे रुपये तिकीट आहे. परंतु, अधिक मासाच्या पार्श्वभूमीवर खास महिलांसाठी ही यात्रा स्पेशल सोय करण्यात आली आहे. महिलांना सन्मान योजना असल्यामुळे महामंडळाने महिलांसाठी खास यात्रा स्पेशल बस सोडण्याचे नियोजन केले आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे लातूर बसस्थानक प्रमुख ह. लीं. चपटे यांनी केले आहे. एकत्र येऊन ४३ महिला प्रवाशांनी मागणी केली तर देवदर्शनासाठी बस सोडली जाईल. त्यासाठी आगाराशी संपर्क साधावा, असे आवाहन स्थानक प्रमुख हणमंत चपटे यांनी केले आहे.

टॅग्स :State Governmentराज्य सरकारtourismपर्यटन