शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

लातूर-जहिराबाद राष्ट्रीय महामार्ग २४ तासानंतरही वाहतुकीस बंदच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2021 10:22 AM

महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश राज्याची वाहतूक ठप्प

ठळक मुद्देमांजरा-तेरणा संगमावर पुर ओसरेना

-बालाजी थेटेऔराद शहाजानी (जि. लातूर) : जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे औराद शहाजनी परिसरातील मांजरा-तेरणा संगमावर पूरस्थिती चौथ्या दिवशीही कायम असून, यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प आहे.  राष्ट्रीय महामार्ग ७५२ के वरील औराद शहाजानी येथील पुल तेरणा नदीच्या पाण्यात गेल्याने महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश या चार राज्याची वाहतूक गेल्या २४ तासापासुन बंदच आहे. दाेन्ही बाजुने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दरम्यान मांजरा तेरणा नदीच्या पुराचे पाणी दाेन्ही नदी संगमावर पसरुन बँक वाँटर अनेक गावात घुसले आहे. गुलाब वादळामुळे लातुर व उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक भागात अतिवृष्टी झाल्याने अगोदरच मांजरा तेरणा नदीचे पात्र भरून वाहत असताना यात पावसाचे पाणी मांजरा व तेरणा प्रकल्पाचे पाणी सोडण्यात आल्यानंतर पूरस्थिती निर्माण झाली आहे. परिसरातील हजारो हजारो हेक्टर जमीन पिकासह पाण्याखाली गेली. यातच औराद शहाजनी येथे तेरणा मांजरा नदीचा संगम होतो. या दोन्ही नद्याचे पुराचे पाणी एकत्र आल्याने दहा किलोमीटर पाणी पसरले आहे. नदीकाठच्या हालसी, तगरखेडा, हंचनाळ, चिचोंडी, वांजरखेडा, जामखंडी, हालसी, तुगाव, औराद माने, जवळगा, सावरी, नदीवाडी यासह अनेक गावांच्या सखल भागात पाणी पसरले आहे. हालसी गावात तर मांजरा नदीचे पाणी ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये ग्रामस्थांना स्थलांतरित केले होते त्या शाळेत सुद्धा पोचले आहे प्रशासनाने गावातच उंच ठिकाणी अनेक गावातील नागरिकांना स्थलांतरित केले आहे. दुपारनंतर पूरस्थिती निवळेल असे, निलंगा तहसीलदार गणेश जाधव यांनी सांगितले. आत्तापर्यंत हासली, हंचनाळ, चिचांडी गावातील १०० लाेकांना स्थलांतरित केल्याचे औराद पाेलिस ठाण्याचे सपाेनि संदीप कामत यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूरfloodपूर