शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

जिम्नॅस्टिकमध्ये लातूरच्या सुषमाचा करिष्मा; एशियन गेम्स स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 6:23 PM

एरोबिक्स जिम्नॅस्टिकमधील एरो डान्स प्रकारात तिने आता हातखंडा मिळविला आहे.

- महेश पाळणे लातूर : शरीराची फ्लेक्झिबिलिटी, स्ट्रेंथ व उत्कृष्ट एलिमेंट्सच्या जोरावर जिम्नॅस्टिक खेळात गुणांची कमाई करणाऱ्या लातूरच्या सुषमा भाऊराव शिंदेने या खेळात करिष्मा केला असून, मंगोलिया येथे होणाऱ्या एशियन गेम्स स्पर्धेसाठी तिची भारतीय संघात निवड झाली आहे. या खेळात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्तरावर जिल्ह्यातून तिची निवड झाली असून, ती या खेळातील पहिलीच आंतरराष्ट्रीय खेळाडू ठरणार आहे.

लातूर तालुक्यातील टाकळगाव येथील रहिवासी सुषमा शिंदेला लहानपणापासूनच खेळाची आवड. योगा व मल्लखांबच्या माध्यमातून तिने खेळाला सुरुवात केली. त्यानंतर तिचे पाऊल जिम्नॅस्टिक खेळाकडे वळले. एरोबिक्स जिम्नॅस्टिकमधील एरो डान्स प्रकारात तिने आता हातखंडा मिळविला आहे. त्यामुळे तिची वरिष्ठ भारतीय संघात निवड झाली आहे.

जिद्द व नियमितता आली कामी...रुद्र स्पोर्ट्सच्या माध्यमातून तिने या खेळात लय साधत ही किमया साधली आहे. खेळाप्रती असलेली जिद्द, नियमितता या माध्यमातूनच तिने हे यश मिळविले आहे. सध्या बीपीएडचे शिक्षण घेणाऱ्या सुषमाने या खेळात लातूरचे नाव उज्ज्वल केले आहे. तिला प्रशिक्षक शिवछत्रपती पुरस्कार विजेते मकरंद जोशी, जिल्हा सचिव आशा झुंजे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाचे ॲड. महादेव झुंजे-पाटील, संजय भुसनुरे, मोहन झुंजे-पाटील, प्रियंका सगरे यांनी कौतुक केले.

विद्यापीठ व राष्ट्रीय स्पर्धेतही छाप...आजतागायत तिने तीन राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदविला असून, दोनवेळा आंतर विद्यापीठ स्पर्धेतही प्रतिनिधित्व केले आहे. सात वेळा राज्य स्पर्धेत सहभाग नोंदवून तिने विविध पदके मिळविली आहेत. मिक्सपेअर श्रेणी व एरो डान्समध्ये तिने अनेक वेळा रौप्य व कांस्यपदक पटकाविले आहे. २०१९ साली तिची आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेसाठी निवड झाली होती. मात्र काही कारणास्तव तिला जाता आले नाही. भारतीय संघाची निवड चाचणी छत्रपती संभाजीनगर येथे झाली होती. यातूनच तिची निवड झाली असून, एशियन चॅम्पियनशिप स्पर्धा १३ ते १७ सप्टेंबर दरम्यान मंगोलिया येथे होणार आहे. यासाठीचे सराव शिबिरही छत्रपती संभाजीनगरात सुरू आहे.

कठोर परिश्रमाचे फळ...भारतीय संघात निवड झाल्याचा आनंद झाला. यासाठी आपण भरपूर प्रयत्न केले असल्याचे तिने सांगितले. सरावातील सातत्य व प्रशिक्षकांनी दिलेले उत्तम प्रशिक्षण याचेच हे फलित असल्याचे सुषमा शिंदेने ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :laturलातूर