वाढवणा (बु.) (जि. लातूर) : बीदर-नांदेड राज्य महामार्गावरील वाढवणा पाटी परिसरात सोमवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास बिबट्या आढळल्याची घटना घडली. उदगीर-नांदेड या बस चालकाने बिबट्या समोर दिसल्याने अचानकपणे ब्रेक लावला. यावेळी बिबट्याचे प्रवाशांना दर्शन झाले. हा बिबट्या केसगीरवाडी तलावाकडे गेल्याचे सांगण्यात आले.
उदगीर बसस्थानकातून नांदेडच्या दिशेने सोमवारी सकाळी ६ वाजता बस मार्गस्थ झाली. ६.३० वाजण्याच्या सुमारास वाढवणा पाटीनजिक ही बस आली. दरम्यान, अचानकपणे बस चालकाला समोर बिबट्या दिसल्या. यावेळी बस चालकाने बसचा वेग कमी करीत थांबविली. किनी यल्लादेवी शिवारातून हा बिबट्या केसगीरवाडी तलावाकडे जात होता. चालकाने अचानकपणे बस का थांबविली म्हणून प्रवाशांनी आपल्या नजरा खिडकीतून बाहेर वळविल्या. यावेळी बिबट्या केसगीरवाडीच्या दिशेने निघाला होता. बिबट्याचे दर्शन आंखो देखा हाल झाल्याने प्रवाशांचा जीव भांड्यात पडला आणि बस चालकाने आपली बस नांदेडच्या दिशेने मार्गस्थ केली. बिबट्या आढळल्याची माहिती वाºयासारखी परिसरातील गावात पोहोचली. परिणामी, गावकºयांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
वनविभागाने दिला दुजोरा...वाढवणा (बु.) सह खेर्डा, कल्लूर, डोंगरशेळकी, किनी यल्लादेवी, मन्ना उमरगा आदी गावच्या परिसरात बिबट्या आढळल्याच्या घटनेला वनविभागाचे नामदेव डिगोळे यांनी दुजोरा दिला आहे.
आम्ही पाहिला बिबट्या...उदगीर-नांदेड बसने प्रवास करणारे शिक्षक व्यंकट सोमवंशी, भागवत मुसने यांनी बिबट्याला पाहिल्याचे सांगितले. मंगळवारी दिवसभर बिबट्याची चर्चा होती.