शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

लातूरला पाणी पुरणाऱ्या मांजरा धरणातील जिवंत पाणीसाठा स्थिर, आता परतीच्या पावसावर मदार

By हणमंत गायकवाड | Published: August 30, 2022 4:41 PM

दहा दिवसांपासून पावसाने दडी दिल्याने प्रकल्पात पाण्याचा येवा नाही

लातूर : लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात गेल्या दहा दिवसांपासून पाण्याची वाढ नाही. यंदाच्या पावसाळ्यात २८.६२९ दलघमी नवीन पाणी आले आहे. आता धरणात एकूण ७५.९१६ दलघमी जिवंत पाणीसाठा आहे. जो की, गेल्या दहा दिवसांपासून स्थिर आहे. प्रकल्प क्षेत्रात पाऊस नसल्याने धरणातील पाणीसाठा जैसे थे आहे. 

मांजरा प्रकल्पातून दररोज लातूर शहरासाठी ४० ते ४५ एमएलडी पाणी उचलले जाते. त्यातून शहराला चार दिवसांआड पुरवठा केला जातो. यंदा पहिल्यांदाच धरणामध्ये  सुरुवातीच्या पावसात साठा झाला असला तरी गेल्या दहा दिवसांपासून प्रकल्पात नव्याने पाणी आले नाही. २० पासून ३० ऑगस्टपर्यंत वाढ नाही. ४२.९० टक्के जिवंत पाणीसाठा आहे. २० तारखेला जो धरणात साठा होता, तोच ३० तारखेपर्यंत आहे. गतवर्षीच्या पावसाळ्यातील ४७.२८७ दलघमी पाणी धरणात होते. त्यात २८.६२९ दलघमीची यंदा वाढ झाली आहे. 

१७६.९६३ जिवंत पाणीसाठा क्षमतामांजरा प्रकल्पात १७६.९६३ दलघमी जिवंत पाणी साठवणूक क्षमता आहे. त्यापैकी सद्य:स्थितीत ७५.९१६ दलघमी जिवंत पाणीसाठा आहे. गेल्या २० तारखेपासून हा साठा स्थिर आहे. या धरणावर लातूर शहरासह एमआयडीसी, औसा एमआयडीसी, अंबाजोगाई, केज, धारूर, कळंब आदी शहरांचा पाणी पुरवठा आहे. 

परतीच्या पावसावरच मदार... २०१६ च्या अभूतपूर्व पाणीटंचाईनंतर दरवर्षी धरण जवळपास भरत आलेले आहे. गेल्या सहा वर्षांत परतीच्या पावसानेच धरण भरलेले आहे. यंदा प्रारंभीच्या पावसात धरणात २८.६२९ दलघमी पाणी झाले आहे. साधारणपणे सप्टेंबर, ऑक्टोबरमध्येच धरण भरले असल्याचा पुर्वानुभव आहे. त्यामुळे परतीच्या पावसावरच मदार आहे. 

प्रकल्प क्षेत्रात ४१३ मि.मी. पाऊस प्रकल्प क्षेत्रामध्ये आतापर्यंत ४१३.३० मि.मी. पाऊस झाला असून, १६ ऑगस्टपासून प्रकल्प क्षेत्रात पाऊस न झाल्याने तेव्हापासून पाण्याचा येवा बंद झालेला आहे. 

प्रकल्पाची सद्य:स्थिती६३९.४० मीटर सद्य:स्थितीत पाण्याची पातळी १२३.०४६ धरणातील पाणीसाठा४७.१३० धरणातील मृत पाणीसाठा७५.९१६ दलघमी धरणातील जिवंत साठा

धरणाची एकूण क्षमता६४२.३७ मीटर पाणी पातळी क्षमता२२४.०९३ दलघमी पाणीसाठा क्षमता१७६.९६३ दलघमी जिवंत पाणीसाठा क्षमता

टॅग्स :laturलातूरDamधरणWaterपाणीRainपाऊस