जिल्ह्यातील जनावरांची एकूण आकडेवारी
शेळ्या १,४६,८८६
मेंढ्या ३५,०००
बैल १,१०,०००
गायी १,३२,०००
म्हशी २, ४०,०००
या आवश्यक लसी दिल्या जातात
वेगवेगळ्या ऋतुमध्ये पशुधनासाठी लसीकरण केले जाते. पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने घरोघरी जाऊन पशुधनाची संख्या लक्षात घेऊन लसीकरण मोहीम राबविली जाते. एफएमडी, घटसर्प, फऱ्या, लाळ्याखुरकत, आत्रविशर आदी लसीकरण करण्यात आले आहे. तसेच पावसाळ्यामध्ये राबविण्यात येणाऱ्या मोहिमेसाठी आवश्यक असणाऱ्या लसी पुढील काही दिवसांत पशुवैद्यकीय विभागाला प्राप्त होतील. त्यानंतर लसीकरण होणार आहे.
कोरोना काळातही बजावली सेवा
कोरोनाच्या संकटकाळात पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांनी लसीकरण मोहिमेला खंड पडू दिला नाही. फ्रंटलाईन वर्कर म्हणून पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले आहे. मात्र पशुसेवेसाठी बाहेर फिरावे लागत असल्याने घरी कोरोना प्रादुर्भावाचा धोका आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचे लसीकरण करण्याची मागणी होत आहे.
नियमित लसीकरण मोहीम
जिल्ह्यात गेल्या दीड वर्षांपासून नियमितपणे लसीकरण मोहीम राबविली जात आहे. गावोगावी विशेष मोहिमा राबविल्या जात आहेत. पावसाळ्यातील लसीकरणही लवकरच पूर्ण केले जाईल. - डॉ. नानासाहेब कदम, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त
पशुवैद्यकीय सेवेबद्दल समाधान
आमच्या गावात नियमितपणे पशुवैद्यकीय सेवा मिळतात. पशुवैद्यकीय डॉक्टरांना फोन केल्यास ते तत्काळ उपलब्ध होतात. दरम्यान, पशुधनाची लसीकरण मोहीम राबविली आहे. - धोंडोपंत कुलकर्णी
कोरोनामुळे पशुधनाचे लसीकरण लांबणीवर पडते की काय, अशी शक्यता होती. मात्र पशुवैद्यकीय सेवा अत्यावश्यक असल्याने लसीकरण करण्यात आले आहे. दरम्यान, पशुधनाच्या बाबतीत सर्वतोपरी मदत होत आहे. - शरद पाटील