चाकूर ( लातूर ) : कायमस्वरूपी शिक्षकांची नेमणुकीची मागणी करत चाकूर तालुक्यातील उकाचीवाडी येथील जिल्हा परिषद शाळेला ग्रामस्थांनी कुलूप ठोकले.
उकाचीवाडी येथे जिल्हा परिषदेची १ ली ते ४ थी पर्यंतची दोन शिक्षिकी शाळा आहे. शाळा सुरु झाल्यानंतर येथील दोन्ही शिक्षक अर्जित रजेवर गेले. तेव्हापासून या शाळेत प्रतिनियुक्तीवर जवळपास सात ते आठ शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. यातच शनिवारी प्रतिनियुक्तीवर असलेल्या शिक्षकाने सुटी घेतल्याने शाळा बंद होती. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारास टाळे ठोकले.
आज ग्रामस्थांनी शाळेसाठी कायमस्वरूपी दोन शिक्षक आल्याशिवाय शाळा उघडली जाणार नाही असा पवित्रा घेतला. दरम्यान जाऊ देणार नाही.असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता. दरम्यान, आजही संबंधित शिक्षिका शाळेत आल्याच नाही. यामुळे सकाळी शाळेसाठी आलेली विद्यार्थी घरी परतली.
कारवाई करण्यात येईल बदलीनंतर दोन्ही महिला शिक्षिका एकाच दिवशी अर्जित रजेवर गेल्या. त्यांना शाळेवर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या रुजू झाल्या नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. - संजय पंचगल्ले, गटशिक्षणाधिकारी