औसा : शिवसेना-भाजपा युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी औसा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित महायुतीची सभा सुरु आहे. या सभेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत कविता सादर करून विरोधकांना चिमटे काढले. तसेच, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद मिटवण्यासाठी आपण रक्त आटवल्याचे सांगत आपल्या भाषणात धम्माल उडवून दिल्ली.
रामदास आठवले म्हणाले, "येरे येरे पावसा मतांच्या पावसाशृंगारेंना निडणून देणार आहे लातूरचं औसाम्हणूनच पाहूत शृंगारेेंच्या नौसाआणि ओमराजेंना निवडून आण्यासाठीयेरे येरे लवकर पावसाआज या ठिकाणी आपली महायुतीची अत्यंत प्रचंड अशापद्धतीची सभाभीम शक्तीची सभाभारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय आणि रासप आणि आमच्या महायुतीची जाहीर सभातुम्हाला मी दिली आहे फार मोठी मुभाम्हणूनच नरेंद्र मोदींची एवढी मोठी या ठिकाणी सभाआज याठिकाणी उद्धव ठाकरे सुद्धा आले आहेतम्हणजे, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी आपले वाद मिटवलेकारण, त्यांच्यामध्ये होते रामदास आठवलेअरे तुम्हाला एकत्र आण्यासाठी मी माझं रक्त आटवलेम्हणून शृंगारे आणि रामराजेंना पार्लमेंटमध्ये पाठवलेआम्ही लोकांच्यासाठी काम करणारे लोक फक्त आरोप करणारी आमची भूमिका नाहीविरोधकांनी जे काय करावं, पण नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही देशाचा विकास करण्याचा प्रयत्न करतो आहोत. बाबासाहेब आंबेडरांनी ज्या संविधानतला भारत उभारण्याचा आमचा सरकार प्रयत्न आहेएनडीएचं सरकार आहे, ते भूल थाफा देणारं नाही..."
दरम्यान, औसा येथे उस्मानाबाद मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व लातूर मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ सभा होत आहे. यावेळी भाजपा आणि शिवसेनेच्या युतीची घोषणा झाल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत.