शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

कोरोनाच्या संकटातही शिकण्यासारखे भरपूर : डॉ. अविनाश सावजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2020 7:47 PM

नीट-जेईईचा ताण कशाला? या विषयावर डॉ. सावजी यांचा ‘लोकमत’ फेसबुक लाईव्हवर बुधवारी दीर्घ संवाद झाला.

ठळक मुद्देनीट-जेईईची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना द्या पाठबळकाही छंद जोपासा. ध्यान करा. योगा करा.

लातूर : कोरोनाचे संकट आपल्या एकट्यावर नाही, तर ते सबंध जगावर आहे. हे समजून घेऊन या संकटातही शिकण्यासारखे भरपूर आहे. परीक्षांच्या तारखा बदलत गेल्या, नक्कीच विद्यार्थ्यांवर ताण आहे. अशावेळी विद्यार्थ्यांना पाठबळ द्या, त्यांना त्यांच्या आवडीच्या गोष्टींमध्ये काही काळ रमू द्या, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश सावजी यांनी केले.

नीट-जेईईचा ताण कशाला? या विषयावर डॉ. सावजी यांचा ‘लोकमत’ फेसबुक लाईव्हवर बुधवारी दीर्घ संवाद झाला. ते म्हणाले, देशात १५ लाख कुटुंबात नीट परीक्षेची चिंता आहे. मे मध्ये ताण संपेल, असे समजून सर्वांनी अभ्यास केला. जुलैची परीक्षा सुद्धा सप्टेंबरमध्ये होणार आहे. ज्यांची थोडी तयारी राहिली आहे, त्यांना दोन महिने मिळाले आहेत. ज्यांचा अभ्यास झाला आहे, त्यांनी थोडी विश्रांती घेऊन पुन्हा उजळणी करावी. बारावीचे वर्ष महत्त्वाचे असल्याने सर्वांचे लक्ष अभ्यासाकडे असते. मनासारखे काही करता येत नाही. इतकेच नव्हे तर आरोग्याकडेही दुर्लक्ष होते. आता अधिकचा मिळालेला वेळ मनासारखे काही करण्यासाठी घालवा. स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष द्या, कोरोनाने आपल्याला हेच शिकविले आहे. परीक्षांच्या तारखा आपल्या हातात नाहीत. परीक्षा संपेपर्यंत तणाव राहणारच आहे. म्हणून चिंता करण्यापेक्षा सकारात्मकपणे भविष्याचा विचार करा. ज्या दिशेने करिअर करायचे आहे, त्याच्यावर विचार करा. काही छंद जोपासा. ध्यान करा. योगा करा. अशावेळी पालक आणि शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मानसिक पाठबळ देण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. सावजी म्हणाले.

थोडा विरंगुळा.. थोडी विश्रांती...सतत अभ्यास केल्याने थकवा, चिडचिड स्वाभाविक आहे. त्यामुळे थोडा विरंगुळा, थोडी विश्रांती घेऊन पुन्हा अभ्यासाला लागा, असा सल्लाही डॉ. सावजी यांनी दिला. यावेळी विद्यार्थी, पालकांनी प्रश्नही विचारले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसStudentविद्यार्थीlaturलातूर