शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

लातूरमध्ये कोचिंग क्लास संचालकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2018 3:10 PM

मारेकऱ्यांनी पाठलाग करून कोचिंग क्लास संचालकावर हल्ला केल्याचा संशय

लातूर : शहरातील ‘स्टेप बाय स्टेप’ कोचिंग क्लासचे संचालक अविनाश बाबुराव चव्हाण यांची रविवारी मध्यरात्री मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. हा थरार उच्चभ्रू वसाहत असलेल्या महसूल कॉलनीतील मुख्य रस्त्यावर घडला. अविनाश चव्हाण (वय ३६) यांनी शिक्षकांची नेमणूक करून स्टेप बाय स्टेप हा कोचिंग क्लास लातूर येथे सुरु केला होता. दरम्यान, रविवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास ते आपल्या साईधाम येथील घराकडे कारने एकटेच निघाले होते. अगदी घराच्या जवळ महसूल कॉलनीतील शाळेजवळ रस्त्यावरच अज्ञात मारेक-यांनी त्यांना गाठले व दोन गोळ्या झाडल्या. पहिला वार निकामी गेला. मात्र दुसरी गोळी अविनाश चव्हाण यांच्या छातीत घुसली. त्यात चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

या गुन्ह्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ़शिवाजी राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी हिंमत जाधव, उपाधीक्षक गणेश किंद्रे्र, पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी पोहोचला़ त्यानंतर अविनाश चव्हाण यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय सर्वोपचार रुग्णालयाकडे पाठविण्यात आला. कोचिंग क्लास चालविणा-या संचालकाचा गोळ्या झाडून खून झाल्याचे वृत्त जिल्हाभरात वा-यासारखे पसरले़ दक्षता म्हणून उद्योग भवन परिसर, सर्वोपचार रुग्णालय येथे मोठा बंदोबस्त तैनात केला आहे़ तसेच खबरदारी म्हणून सोमवार व मंगळवारी खासगी क्लासेस बंद ठेवण्यात आले आहेत.

प्रदीर्घ कालावधी झालेल्या मालू बंधू हत्या प्रकरणानंतर गोळी घालून केलेल्या खुनाचा थरार लातूरकरांसाठी धक्कादायक ठरला़ शैक्षणिकदृष्ट्या प्रगत व शांत शहर अशी ओळख असलेल्या लातूर शहरामध्ये रविवारी मध्यरात्री घडलेली घटना चर्चेची ठरली़अविनाश चव्हाण यांचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी लातूरच्या सर्वोपचार रुग्णालयात पहाटेच्या वेळी आणला़ तिथे नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती़ दुपारी उशिरापर्यंत आरोपींना अटक करा, अशी मागणी नातेवाईकांनी लावून धरली होती़ त्यामुळे गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी व राखीव दलाची एक तुकडीही बंदोबस्ताला होती.

पाठलाग करून झाडल्या गोळ्यापोलिसांच्या अंदाजानुसार अविनाश चव्हाण यांचा मारेकºयांनी मोटारसायकलवरून पाठलाग केला असावा़ हे मारेकरी त्यांच्या मार्गावर नजर ठेवून असावेत. सरस्वती कॉलनीतील महत्त्वाच्या व्यक्तींची निवासस्थाने संपल्यानंतर जिथे रिकामे प्लॉट आहेत तिथेच हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे.

सर्वसामान्य कौटुंबिक पार्श्वभूमीअविनाश चव्हाण यांचे वडील सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी आहेत़ सर्वसामान्य कुटुंबातील चव्हाण यांनी उद्योग भवन परिसरात स्टेप बाय स्टेप नावाने ११ वी तसेच १२ वी विज्ञानच्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग क्लासेस सुरु केले होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले तसेच विवाहित बहीण असा परिवार आहे.

तपासासाठी पाच पथकेजिल्हा पोलीस अधीक्षक डॉ़राठोड म्हणाले, मारेकऱ्यांच्या शोधासाठी पाच पथके रवाना करण्यात आली आहेत़ आम्ही हल्लेखोरांना लवकरच गजाआड करू़ दरम्यान, अशोक गंगाराम पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे़ सदर फिर्यादीच्या जबाबात तिघा जणांवर संशय व्यक्त करण्यात आला आहे़ या संदर्भात उपविभागीय अधिकारी हिंमत जाधव म्हणाले, कुटुंबियांच्या संशयानुसार संबंधितांची चौकशी केली जाईल, त्यानंतरच पुढील कार्यवाही होईल़ तसेच या घटनेचे अन्य काही धागेदोरेही शोधले जात आहेत़

टॅग्स :MurderखूनlaturलातूरTeacherशिक्षक