लातूर : देशात आर्थिक मंदी आली नसून ती लादण्यात आली आहे़ नोटाबंदीसारखीच ही मानवनिर्मित मंदी असून, गोरगरीबांचे कंबरडे मोडण्याचे हे षडयंत्र आहे़ सामान्य माणसाचे जीवन अशांत करण्याचा हा प्रकार आहे़ ज्या देशात ४० टक्क्यांपेक्षा अधिक लोक दारिद्य्र रेषेखाली जीवन जगत आहेत़ त्या देशामध्ये मंदी येतेच कशी, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड़ प्रकाश आंबेडकर यांनी केला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही अडीचशे जागा जिंकूअसे वक्तव्य करून मतदारांनागृहित धरले आहे़ यातून त्यांनी मतदारांचा अवमानच केला आहे, अशी टीका त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता संपादन रॅलीत रविवारी केली.वंचित घटकातील कुटुंब आर्थिक आणि कौटुंबिक प्रश्नांच्या विंवचनेत अडकला पाहिजे, असे प्रयत्न सुरू आहेत़ ज्या दिवशी हे सरकारआपण पाडू त्या दिवशी मंदीसंपुष्टात येईल़ जेवढे दिवस सरकार सत्तेत राहील तेवढे दिवस ही मंदी कायम राहील़ यातून बाहेर पडण्यासाठी आता महाराष्ट्रातले सरकार उलथून टाका. महाराष्ट्रात भाजपचे सरकार येणार नाही, याची काळजी घ्या, असे आवानही त्यांनी केले.
नोटाबंदीसारखीच मंदी मानवनिर्मित - प्रकाश आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 5:03 AM