शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
3
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
4
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
5
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
6
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
7
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
8
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
9
भारतात रिअल इस्टेटमधील सर्वाधिक श्रीमंत उद्योजकांकडे किती संपत्ती?
10
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
11
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
12
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
13
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
14
रॅपर बादशाहच्या चंदीगढमधील नाईटक्लबमध्ये धमाका, मध्यरात्री दोन अज्ञातांनी घडवून आणला स्फोट
15
Utpanna Ekadashi 2024: उत्पत्ती एकादशीनिमित्त पापमुक्तीसाठी विष्णूपूजेत 'ही' फुले अवश्य अर्पण करा!
16
ए.आर.रहमानसोबत अफेअरच्या चर्चांवर मोहिनी डेने सोडलं मौन; म्हणाली- "मी त्यांना कायम..."
17
कामाची बातमी! पत्नीसह ज्वाइंट होम लोन घ्या, कमी व्याज, अधिक रक्कम; अनेक फायदे मिळतील
18
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
19
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
20
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 

वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा, तत्काळ पिकविमा द्या; शेतकऱ्यांचा उदगीर-लातूर मार्गावर रास्तारोको

By संदीप शिंदे | Published: July 10, 2024 6:38 PM

तीन तास चाललेल्या या आंदोलनामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

डिगोळ (लातूर) : शिरूर अनंतपाळ-चाकूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात पिकाचे नुकसान होत असलेल्या व वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, पिकविमा देण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी रयतक्रांती संघटना व शेतकऱ्यांच्या वतीने येरोळमाेड येथील उदगीर-नळेगाव-लातूर राज्य महामार्गावर बुधवारी सकाळी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तीन तास चाललेल्या या आंदोलनामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

आंदोलनात रयतक्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव पेठे, शिवानंद भुसारे, धनराज चावरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. मागण्यांचे निवेदन शिरूर अनंतपाळचे नायब तहसिलदार गोविंद यादव, मंडळ अधिकारी सुनील खंदाडे, वनविभागाचे एस.जी. गिते यांना देण्यात आले. आंदोलनात बस्वराज निला, अमर माडजे, अशोकराव पाटील, राजकुमार बिरादार, शिवाजी पेठे, रामेश्वर चावरे, ऋषिकेश बद्दे, राहूल कांबळे, एस.एन. पाटील, बालाजी महाराज येरोळकर, तानाजी दांडगे, उमाकांत बोळेगावे, दिलीप ढोंबळे, बाळासाहेब केंद्रे, उतम गुणिले, ज्ञानोबा इंद्राळे, रामकिशन गडिमे, दगडवाडी, मल्लिकार्जून सगरे, महेश निवाळे, भानुदास धुमाळे, प्रदिप पाटील, मदन तांबोळकर, गुंडेराव चौसष्टे, वैजनाथ तोंडारे, अण्णाराव पाटील आदींसह शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विठ्ठल दराडे, पोलिस उपनिरीक्षक गजानन अनसापुरे, शिवशंकर बिरादार, अंबादास पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

प्रत्येक ग्रामपंचायतीवर पर्जन्यमापक बसवावे...हरण व रानडुकर या प्राण्यांपासून शेतीत खरिपात पेरणी केलेल्या कोवळी पिकाचे अतोनात नुकसान होत आहे. या प्राण्यांचा बंदोबस्त करावा, १०० टक्के सबसिडीवर तारांचे कंपाऊंड देण्यात यावे, शेतकऱ्यांचे संपुर्ण कर्ज माफ करावे, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे अनुदान देण्यात यावे, मागील वर्षांच्या पिक विमा देण्यात यावा, गायीच्या दुधाला किमान ४० रुपये भाव देण्यात यावा, पर्जन्य मापक प्रत्येक ग्रामपंचायतीवर बसविण्यात यावे, सरकारने शेतकरी व शेतमजूराच्या पाल्यांना उच्च शिक्षण मोफत करण्यात यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

टॅग्स :laturलातूरagitationआंदोलनFarmerशेतकरी