शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
4
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
5
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
6
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
9
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
10
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
11
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
12
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
13
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
14
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
15
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
16
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
17
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
18
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
19
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
20
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला

मांजरा २९ टक्के भरले, पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली; सिंचनासाठी मोठ्या पावसाची गरज

By हणमंत गायकवाड | Published: October 02, 2023 11:54 AM

मांजरा प्रकल्पात २९ टक्के जिवंत पाणीसाठा : ४३ वर्षांमध्ये १६ वेळा धरण १०० टक्के भरले

लातूर :लातूर शहरासह मांजरा प्रकल्पावर अवलंबून असलेल्या एकूण २२ पाणीपुरवठा योजनांसाठी पाणी उपलब्ध झाले असले तरी सिंचनासाठी धरण भरणे आवश्यक आहे. सद्य:स्थितीत प्रकल्पात ५०.५९४ दलघमी जिवंत पाणीसाठा झाला आहे. म्हणजे २९ टक्के पाणी प्रकल्पात संकलित झाले आहे. मांजरा प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्या अंतर्गत जवळपास ३३ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येते. रब्बी आणि उन्हाळी पिकासाठी पाणी घ्यायचे झाले तर मोठा पाऊस होणे गरजेचे आहे.

मांजरा प्रकल्प क्षेत्रात आतापर्यंत ५६० मिमी पाऊस झाला आहे. या पावसावर यंदा वीस ते पंचवीस दलघमी नवीन पाणीसाठा झाला आहे. मांजराच्या वर असलेले दोन छोटे प्रकल्प अद्याप भरले नाहीत. त्यामुळे या प्रकल्पांच्या वर पाऊस होणे गरजेचे आहे. तरच मांजरा प्रकल्पात पाणी येते. गेल्या ४३ वर्षांमध्ये मांजरा प्रकल्पात १६ वेळा शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. बहुतांश वेळा मांजरा प्रकल्प परतीच्या पावसात भरलेला आहे. गतवर्षी १५ ऑक्टोबरला धरण भरले होते. यंदाही सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासूनच प्रकल्पात येवा सुरू झालेला आहे.

४३ वर्षांत १२ पावसाळ्यांत धरण कोरडेमांजरा प्रकल्पाचे लोकार्पण १९८० मध्ये झाले. १९८० पासून धरण सोळा वेळा १००% भरलेले आहेः त्यानंतर १२ पावसाळ्यांत धरण कोरडेच राहिलेले आहे. पाऊस न झाल्यामुळे धरणाची ही स्थिती होती. सात वेळा धरण ५० टक्क्यांच्या पुढे भरले तर आठ वेळा ५०% च्या आत धरणात पाणीसाठा झाला होता. गत सोळा वेळा भरलेले धरण बहुतांश ऑक्टोबर महिन्यात किंवा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात भरले आहे.

मांजरा प्रकल्पामुळे १८ हजार २२३ हेक्टर जमीन ओलिताखाली....मांजरा प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांतर्गत १८ हजार २२३ हेक्टर जमीन ओलिताखाली येते. डावा कालवा ९० कि.मी. अंतराचा आहे . त्यातून १०,५५९हेक्टर जमीन सिंचनाखाली आहे. तर, उजवा कालवा ७८ कि.मी.चा असून त्याअंतर्गत ७६६५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. मात्र, त्यासाठी धरण १००% भरणे आवश्यक आहे. तरच सिंचनासाठी पाणी सोडण्यात येते.

लातूर शहराला दररोज लागते ५५ एमएलडी पाणीलातूर शहरासाठी मांजरा प्रकल्पातून दररोज ५० ते ५५ एमएलडी पाणी उचलले जाते. गेल्या काही महिन्यांपासून लातूर शहरात पाच दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यापूर्वी आठ दिवसांआड करण्यात येत होता. पण, गतवर्ती धरणात शंभर टक्के पाणीसाठा झाल्याने पाच दिवसांआड करण्यात येत आहे. पण, धरणातील सध्याचा पाणीसाठा लक्षात घेता सहा दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महानगपालिका घेणार आहे, असे पाणीपुरवठा विभागातून सांगण्यात आले आहे.

टॅग्स :RainपाऊसlaturलातूरFarmerशेतकरी