शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

शासकीय कार्यालयात मार्चअखेरची लगीनघाई; सुटी दिवशीही जिल्हा परिषद सुरु

By हरी मोकाशे | Published: March 28, 2024 7:14 PM

मार्च महिना आर्थिक वर्षाचा ताळेबंद सादर करण्याचा महिना होय. त्यामुळे प्रत्येक शासकीय कार्यालयात मार्चअखेरची धावपळ सुरु असते.

लातूर : सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. त्यातच आर्थिक वर्षाचा अखेरचा महिना आल्याने जिल्हा परिषदेत मार्चअखेरची लगीनघाई सुरु आहे. २९, ३० व ३१ मार्च रोजी सार्वजनिक, साप्ताहिक सुट्टी असतानाही विनाविलंब कामांचा निपटारा व्हावा तसेच तात्काळ अनुदान वितरित व्हावे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अनमोल सागर यांनी या तिन्ही दिवशी कार्यालय सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितींचे कामकाज नियमितपणे सुरु असल्याचे पहावयास मिळणार आहे.

मार्च महिना आर्थिक वर्षाचा ताळेबंद सादर करण्याचा महिना होय. त्यामुळे प्रत्येक शासकीय कार्यालयात मार्चअखेरची धावपळ सुरु असते. शासनाकडून उपलब्ध निधीचा तात्काळ वापर व्हावा जोरदार प्रयत्न सुरु असतात. दरम्यान, सध्या लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. तत्पूर्वी जिल्हा परिषदेअंतर्गतच्या प्रस्तावित विकास कामांना मंजुरी देण्यासाठी सार्वजनिक व साप्ताहिक सुट्टी रद्द करण्यात आली होती.

दरम्यान, मार्चअखेरमुळे विविध योजना, विकास कामांसाठी शासन अथवा वरिष्ठ कार्यालयाकडून अनुदान प्राप्त होते. हे अनुदान बीडीएस प्रणालीद्वारे देयके तयार करुन कोषागार कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे. तसेच जिल्हा परिषदेअंतर्गतच्या विविध योजना, विकास कामांसाठी प्राप्त निधीचा मुदतीत निपटारा व्हावा म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी शुक्रवार, शनिवार व रविवार या सार्वजनिक व साप्ताहिक सुटी दिवशी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कार्यालय नियमितपणे सुरु ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.

कार्यालय प्रमुखांनी दक्षता घ्यावी...२९ मार्च रोजी सार्वजनिक सुटी आहे तर ३० आणि ३१ मार्च रोजी साप्ताहिक सुटी आहे. मात्र, मार्चअखेरमुळे या तिन्ही दिवशी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सुरु राहणार आहे. या दिवशी कोणताही कर्मचारी अनुपस्थित राहणार नाही, याची दक्षता कार्यालयप्रमुखांनी घेण्याच्या सूचना सीईओ अनमोल सागर यांनी केल्या आहेत.- नितीन दाताळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन.

टॅग्स :laturलातूरLatur z pलातूर जिल्हा परिषद