वृक्ष लागवड मोहिमेस गती देण्यासाठी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी बाजार समिती परिसरात साडेसात एकर जमिनीवर फळझाडे लागवडीची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा प्रारंभ २०० फळझाडांच्या रोपांची लागवड करून करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख डॉ. शोभाताई बेंजरगे, शिवाजीराव माने, भागवत वंगे, जि.प.चे माजी अध्यक्ष पंडितराव धुमाळ, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील, नामदेवराव जगताप, सुरेंद्र धुमाळ, बाजार समितीचे अध्यक्ष लक्ष्मणराव बोधले, उपाध्यक्ष कल्याणराव बर्गे, हाजी सराफ, दत्तात्रय बंडगर, संजीव बिराजदार, तानाजी निडवंचे, ॲड. सुतेज माने, सुधीर लखनगावे, अनिल देवंगरे, अमर आवाळे, नंदकुमार तांबोळकर, ओमप्रकाश गलबले, दत्ता शिवणे, भरत शिंदे, वैशंपायन जागले, महेताब शेख, रमेश सोनवणे, बसवराज धुमाळे आदींची उपस्थिती होती.
बाजार समिती पदाधिकाऱ्यांनी घेतली वृक्षसंवर्धनाची जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 4:15 AM