उदगीर : भारतीय जनता पक्षाच्यावतीने राज्यभरात सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. आज सकाळी उदगीर शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहरातून गौरव यात्रा काढण्यात आली.
भारतीय जनता पक्षाचे अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी आ. सुधाकर भालेराव, गोविंदराव केंद्रे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या गौरव यात्रेला सकाळी प्रारंभ करण्यात आला. यात्रेची छत्रपती शाहू महाराज चौकात सांगता झाली. यावेळी भारत माता की जय, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विजय असो व वंदे मातरमच्या घोषणा देण्यात आल्या.
यावेळी माजी आ. सुधाकर भालेराव यांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करीत ही गौरव यात्रा यशस्वी करण्यासाठी सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले. तसेच माजी आ. गोविंद केंद्रे यांनीही मनोगत व्यक्त केले.गौरव यात्रेत माजी आ. धर्माजी सोनकवडे, शहराध्यक्ष मनोज पुदाले, तालुकाध्यक्ष बस्वराज रोडगे, नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधीर भोसले, अमोल निडवदे, धर्मपाल नादरगे, बापूराव राठोड, नंदकुमार नलंदवार, मनोहर भंडे, सतीश उस्तुरे, ॲड. दत्ता पाटील, बसवराज पाटील कोळखेडकर, साईनाथ चिमेगावे, अरुणा चिमेगावे, उत्तरा कलबुर्गे, सरोजा वारकरे, प्रा. पंडित सूर्यवंशी, मंदाकिनी जीवने, वर्षाराणी धावारे, आनंद बुंदे, व्यंकट काकरे, बालाजी गवारे, राजकुमार देशमुख, आनंद साबणे, सुनील सावळे, सुधाकर बिरादार, अमर सूर्यवंशी, नवज्योत शिंदे, पप्पू गायकवाड, संगम अष्टुरे, भारती सूर्यवंशी, महादेव टेपाले, शहाजी पाटील, वसंत शिरसे, हनुमंत रेड्डी, स्वाती वट्टमवार, शिवाजी भोळे, जया काबरा, माधव टेपाले, अमोल अनकल्ले, कृपा सूर्यवंशी, मधू कनशेट्टे आदींसह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.