शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
3
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
4
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
5
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
7
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
9
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
10
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
11
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
12
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
13
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
14
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
15
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
17
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
18
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
19
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
20
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...

‘मुळशी पॅटर्न’ पाहून खून, क्षुल्लक कारणावरून घडले अनेक गुन्हे; पोलिसांचा कारवाईचा बडगा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2022 12:31 PM

अलीकडे अल्पवयीन मुलांच्या टोळ्यांनी डोके वर काढले आहे.

- राजकुमार जोंधळेलातूर : सुसंस्कृत आणि शांत शहर म्हणून लातूरची ओळख असली तरी गेल्या काही महिन्यांमध्ये घडलेल्या घटनांमुळे याला काहीअंशी गालबोट लागले होते. दोन खून, चार दरोडे आणि दहशतीच्या चार घटना घडल्याने सार्वजनिक शांतता भंग झाली होती. विशेष म्हणजे ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपट पाहून मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना घडल्याने शहर हादरले.

अलीकडे अल्पवयीन मुलांच्या टोळ्यांनी डोके वर काढले आहे. केवळ क्रेझ आणि दाक्षिणात्य चित्रपटातील गुन्हेगारीचे असलेले आकर्षण. याच आकर्षणातून गुन्हेगारीमध्ये कोयता, चाकू, तलवारीचा वापर होत असल्याचे समोर आले आहे. गोकुळ मंत्री याचा भरदिवसा कोयता, धारदार शस्त्र आणि चाकूने वार करून खून करण्यात आला होता, तर लातुरातील गजबजलेल्या साईमंदिर परिसरात एका वर्गमित्राचा खून एका १७ वर्षीय मित्रानेच ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपट पाहून केला होता. हळदीच्या कार्यक्रमात हातात तलवार, कोयता घेऊन डान्स करणाऱ्या नवरदेवाचा, मित्राचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी नवरदेवासह इतरांना अटक केली आहे.

टोळ्यांची दहशत मोडून काढू...लातुरात टोळीटोळीने गुन्हे करणाऱ्या टोळ्या अलीकडे डोके वर काढत होत्या. मात्र, पोलिसांनी अशा गटांना, टोळ्यांना आणि गुन्हेगारांना अद्दल घडविण्यासाठी कारवाईचा बडगा उगारला आहे. पंकज पारीख टोळीतील सराईत सहा गुन्हेगारांवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई केली आहे. गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी कठोरातील कठोर कारवाई पोलीस करतील.- निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक, लातूर.

गत सहा महिन्यांतील गुन्हेदिवसाढवळ्या खून - २ (लातूर )दरोडा - ४ (लातूर, चाकूर)सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करणे - ४ (लातूर)मोक्का कारवाई - ६ जणांवर (लातूर)

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर