शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
3
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
4
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
5
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
6
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
7
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
8
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
9
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
10
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
11
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
12
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
13
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
14
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
15
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
16
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
17
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
18
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
19
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
20
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?

मोदीनंतर आता 'गडकरी गॅरंटी'; मराठवाड्याच्या विकासाची नितीन गडकरींनी दिली ग्वाही

By संदीप शिंदे | Updated: May 3, 2024 18:51 IST

मराठवाड्यात जलसंवर्धनाचे काम वाढले तर शेतकरी जीवन संपवणार नाहीत.

निलंगा : लातूरसह मराठवाड्याच्या विकासाची गॅरंटी माझी राहील. ही निवडणूक अन्नदाता शेतकरी सुखी होण्यासाठी आणि सामान्य जनतेच्या उन्नतीसाठी आहे. त्यामुळे अपप्रचार करणाऱ्यांना बाजूला सारा, असे आवाहन केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी निलंग्यातील सभेत केले.

मंचावर माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण, क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे, माजी मंत्री आ. संभाजी पाटील-निलंगेकर, माजी खा. रूपाताई पाटील-निलंगेकर, आ. अमर राजूरकर, आ. देवराज होळी, उपस्थित होते. यावेळी गडकरी म्हणाले, गेल्या दहा वर्षांत केंद्र सरकारने विकासाला गती दिली. आजवर साडेचार लाख खेडी महामार्गांना जोडल्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा झाला. २०१४ मध्ये केंद्रात मंत्री झाल्यानंतर ई-रिक्षाची सुरुवात करून दीड कोटी लोकांची मानवी शोषणातून मुक्तता झाली. अजूनही ग्रामीण भागात शिक्षणाचा विस्तार झाला पाहिजे. शेतमालाला भाव मिळाला पाहिजे. शरद जोशी यांनी शेतकऱ्यांचे जे प्रश्न मांडले, त्यावर भाजपा सरकार तोडगा काढत आहे. यावेळी उमेदवार खा. सुधाकर श्रृंगारे, डॉ. अर्चना पाटील चाकूरकर, अरविंद पाटील निलंगेकर उपस्थित हाेते.

इथेनॉल निर्मितीतून प्रगती...सोयाबीनचा भाव अर्जेंटिना ठरवते, तेलाचा भाव मलेशिया ठरवते, साखरेचा भाव ब्राझील ठरवते. त्यामुळे शेतमालाला भाव देण्यात अडचणी निर्माण होतात. खरे पाहता जल, जमीन, जंगल, जनावरे यांचा उपयोग करून शेतकऱ्यांची दुरवस्था दूर करण्यासाठी सोयाबीन, मका, ऊस यावर प्रक्रिया करून इथेनॉल निर्मिती झाली तर शेतकरी समृद्ध होईल. शेतकरी निर्मित बायोएव्हिएशन इंधनावर हेलिकॉप्टर आणि स्पाइस जेट विमान यशस्वीरीत्या चालत आहे. शिवाय, मराठवाड्यात जलसंवर्धनाचे काम वाढले तर शेतकरी आत्महत्या होणार नाहीत.

संविधान बदलाचा अपप्रचारविरोधक संविधान बदलले जाईल हा अपप्रचार करीत आहेत. मुळात घटनेतील मूल तत्त्वे कधीही बदलत नाहीत. उलट काँग्रेसने दुरुस्तीच्या नावाखाली ८० वेळा संविधान बदलले, असा आरोप करीत गडकरी यांनी आणीबाणीवर टीका केली.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४latur-pcलातूर