शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
4
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
5
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
6
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
7
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
8
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
9
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
10
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
11
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
12
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
13
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
14
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
15
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
16
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
17
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
18
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
19
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
20
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या

शासनाच्या आदेशाला नाफेडचा ‘खो’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 5:09 PM

- हरी मोकाशे, लातूरशेतमाल विक्रीत शेतकऱ्यांची लूट होऊ नये म्हणून शासनाने नाफेडच्या हमीभाव खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, तीन दिवस उलटले तरी नाफेडचे ऑनलाईनचे पोर्टलच बंद आहे. परिणामी, शासनाच्या आदेशाला नाफेडकडून ‘खो’ मिळत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील ६ लाख २१ हजार ६४४ हेक्टरवर खरिपाचा पेरा ...

- हरी मोकाशे, लातूर

शेतमाल विक्रीत शेतकऱ्यांची लूट होऊ नये म्हणून शासनाने नाफेडच्या हमीभाव खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, तीन दिवस उलटले तरी नाफेडचे ऑनलाईनचे पोर्टलच बंद आहे. परिणामी, शासनाच्या आदेशाला नाफेडकडून ‘खो’ मिळत असल्याचे दिसून येत आहे.

 जिल्ह्यातील ६ लाख २१ हजार ६४४ हेक्टरवर खरिपाचा पेरा झाला होता. त्यात सर्वाधिक सोयाबीनचा पेरा असून, तो ४ लाख १४ हजार ४८० हेक्टरवर आहे. तुरीचा ९३ हजार २३२, मूग १४ हजार १६६, तर उडीदाचा ११ हजार ५७६ हेक्टरवर पेरा झाला होता. यंदा पावसाने दडी मारल्याने बहुतांश ठिकाणची पिके करपली आहेत. ज्या शेतकºयांनी विहीर, बोअरच्या पाण्यावर पिके जगविली असली तरी उत्पादनाचा उतारा मात्र घटला आहे. सध्या मूग आणि उडीदाच्या राशी सुरू असून, शेतकरी हा शेतमाल विक्रीसाठी बाजारपेठेत आणत आहेत. 

केंद्र शासनाने मुगाला ६ हजार ९७५ तर उडीदाला ५ हजार ६०० रुपये आधारभूत किंमत जाहीर केली आहे. प्रत्यक्षात बाजारपेठेत मुगाला ४१०० रुपये तर उडीदाला ४१०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. शेतकऱ्यांची ही आर्थिक लूट होऊ नये म्हणून शासनाने चार दिवसांपूर्वी उडीद, मुगाच्या विक्रीसाठी नाफेडच्या हमीभाव खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शेतकरी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी धावाधाव करीत आहेत. परंतु, नाफेडचे ऑनलाईनचे पोर्टलच बंद असल्याने नोंदणी करावी कोठे? असा सवाल व्यक्त होत आहे. 

पोर्टल बंदमुळे अडचण... मूग, उडीद खरेदीसाठी शेतकºयांनी हमीभाव खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. परंतु, नाफेडचे ऑनलाईनचे पोर्टल बंद आहे. त्यामुळे आम्हीही हतबल झालो आहोत. या संदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करीत असल्याचे नाफेडचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी वाय.ई. सुमठाणे यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकारFarmerशेतकरी