लातूर : केंद्र शासनाने कामगार व शेतकऱ्यांच्या विरोधी कायदा केल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सोमवार दि. २८ रोजी तहसील कार्यालयासमोर गोट्या खेळो आंदोलन करण्यात आले.
बाजार समिती सुधारणा कायदा, वस्तू सुधारणा कायदा आणि कृषी सेवा हे तिन्ही कायदे शेतकरी व कामगारांच्या विरोधातील आहेत, असा निषेध करत कार्यकर्त्यांनी गोट्या खेळो आंदोलन केले.
प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, शहर जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष समीर शेख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
फिरोज शेख, जितेंद्र गायकवाड, विशाल विहिरे, रेखा कदम, रामभाऊ रायेवार, राजेश खटके, योगेश नरवडे, अभिलाष पाटील, जहाँगीर शेख, निखिल मोरे, इरफान बागवान, बबलू तोडकर, सोहम गायकवाड यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.