जळकोट नगरपंचायतीचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने, येत्या काही दिवसांत नगरपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नगरपंचायतीची तयारी करण्यासाठी राज्यमंत्री संजय बनसोडे आणि जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी जिल्हा कार्याध्यक्ष बबनदादा भोसले आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंदन पाटील-नागराळकर यांची निरीक्षक म्हणून निवड केली आहे.
या निवडीबद्दल तालुकाध्यक्ष अर्जुनमामा आगलावे-पाटील, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सत्यावान दळवे, शहराध्यक्ष अशोक डांगे, युवकचे शहराध्यक्ष बाबा घोणसे, कार्याध्यक्ष राजू डांगे, अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष मुमताज बागवान, अल्पसंख्याक सेलचे प्रदेश सरचिटणीस उस्मान मोमीन, राष्ट्रवादी विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष नितीन धुळशेट्टे, व्यंकटराव पवार, धनंजय भरमण्णा, श्याम डांगे, नरसिंह डांगे, माधव भरमण्णा, संदीप डांगे, माधव तिलमिलदार, पिंटू शिंगाडे, दिगांबर भोसले, दत्ता मुगाचे, रामलिंग धुळशेट्टे, नामदेव शिंदे, संपत शिंगाडे, सलीम बागवान, पिराजी कोकणे, यशवंत बनसोडे, गोविंद भरमण्णा, विशाल होनवडजकर, श्याम गवळे, अजित पवार यांच्यासह तालुक्यातील अनेक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काैतुक केले आहे. नगरपंचायत निवडणुकीबाबत रविवार, ७ फेब्रुवारी राेजी सकाळी १० वाजता जळकाेट येथील साेसायटीच्या सभागृहात बैठकीचे आयाेजन केले आहे. यासाठी इच्छुकांसह कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.