लोकमत न्यूज नेटवर्क, लातूर: नीट पेपरफुटी प्रकरणात लातुरातील दोन जिल्हा परिषद शिक्षक तसेच देगलूर (जि. नांदेड) व दिल्लीतील एक अशा चौघांविरूद्ध शिवाजी नगर पोलिस ठाण्यात रविवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. नीटप्रकरणी महाराष्ट्रातही दहशतवाद विरोधी पथकाच्या साह्याने माहितीची पडताळणी करणे सुरू आहे. शनिवारी दोन शिक्षकांना चौकशीसाठी बोलावून नंतर सोडून देण्यात आले होते. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार काही आरोपींच्या मोबाईलवर हॉलतिकिट व आढळून आल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. त्या माहितीच्या आधारे चौघांविरूद्ध रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला.
नव्या कायद्यानुसार गुन्हा दाखल दहशतवाद विरोधी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक आवेझ काझी यांच्या फिर्यादीवरुन संजय तुकाराम जाधव (रा. लातूर), जलीलखाँ उमरखान पठाण (रा. लातूर), ईरन्ना मष्णाजी कोनगलवार (मूळ रा. देगलूर जि. नांदेड ह.मु. आयटीआय उमरगा जि. धाराशिव) आणि गंगाधार (रा. दिल्ली) या चौघांविरोधात केंद्र सरकारने नव्याने केलेल्या पेपरफुटीच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. दाखल असलेल्या गुन्ह्यात जलीलखॉ उमरखान पठाण (रा. लातूर) याला पोलिसांनी रविवारी उशीरा रात्री ताब्यात घेतले आहे.
प्रश्न विचारले, सोडून दिले...ज्या दोन शिक्षकांवर आरोप आहेत, त्यातील एकाने व्हिडीओद्वारे स्पष्टीकरण दिले. पथक आमच्याकडे आले. पोलिस अधीक्षक कार्यालयात त्याने सांगितले. 3 नेऊन आमची चौकशी केली. काही प्रश्न विचारले. त्यानंतर आम्हाला घरी सोडून दिले असल्याचे
'सीबीआय'ची खास पथके बिहार, गुजरातला दिल्ली नीट पेपर लीक प्रकरणात विद्यार्थ्यांकडून देशव्यापी आंदोलने सुरू असताना 'सीबीआय'ने या प्रकरणात रविवारी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणाला सर्वोच्च प्राधान्य देत 'सीबीआय'ने विशेष पथके तयार केली आहेत. ही पथके गोध्रा आणि पाटणा येथे पाठविण्यात आली. कट, फसवणूक, तोतयागिरी, विश्वासघात आणि उमेदवार, संस्था व मध्यस्थांकडून पुरावे नष्ट करणे, यासह व्यापक तपास करण्याची विनंती शिक्षण मंत्रालयाने 'सीबीआय'ला केली आहे. 'सीबीआय'ने आयपीसी १२०-बी (गुन्हेगारी कट) व ४२० (फसवणूक) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
किती जणांनी दिली फेरपरीक्षा?पूर्वी ग्रेस गुण मिळालेल्या १,५६३ विद्यार्थ्यांपैकी ८१३ विद्यार्थ्यांनी रविवारी पुन्हा परीक्षा दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ७ केंद्रांवर फेरपरीक्षा झाली. बिहारमधील केंद्रांवर ५ मे रोजी परीक्षेला बसलेल्या १७ विद्यार्थ्यांना एनटीए ने प्रतिबंधित केले. एजन्सीने यापूर्वी ६३ उमेदवारांना परीक्षेतील गैरप्रकारांबद्दल प्रतिबंधित केले होते.
आता नीट-पीजीदेखील पुढे ढकलली आहे. या सरकारच्या राजवटीत उध्वस्त झालेल्या शिक्षणव्यवस्थेचे हे आणखी एक दुर्दैवी उदाहरण आहे. पेपर लीक करणारी टोळी आणि शिक्षण माफिया यांच्यासमोर सरकार हतबल आहे. - खासदार राहुल गांधी, काँग्रेस नेते