शहरं
Join us  
Trending Stories
1
"खाऊन पिऊन बिल उधार ठेवून आले"; दावोस दौऱ्यात CM शिंदेंची १.५८ कोटींची थकबाकी, कंपनीची नोटीस
2
‘त्या’ ९ मंत्र्यांना पक्षात पुन्हा प्रवेश मिळणार नाही; शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय : देशमुख
3
अबूझमाडच्या जंगलात ३० नक्षल्यांचा खात्मा; घातपाताचा डाव उधळून लावला
4
'पुतण्याचा कौटुंबिक विषय कायमचा संपला' म्हणत आमदार बबनराव शिंदेंची महायुतीला सोडचिठ्ठी
5
हरयाणात भाजपची हॅट् ट्रिक की, काँग्रेसचे होणार पुनरागमन? मतदानाला सुरुवात
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सार्वजनिक क्षेत्रातून प्रशंसा, कौटुंबिक व दांपत्य जीवनात सौख्य लाभेल
7
मंत्रालयात आमदारांच्या जाळीवर उड्या; विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळांसह आदिवासी आमदारांचा संताप
8
नागपुरी गेट पोलीस स्टेशनवर दगडफेक; पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी, मोठं नुकसान
9
पुण्यात मित्राला झाडाला बांधून तरुणीवर सामूहिक बलात्कार; तीन नराधमांचा शाेध सुरू
10
राज्यातील अकृषक कर पूर्ण माफ; सरकारचा निर्णयांचा धडाका सुरूच, मंत्रिमंडळ बैठकीत ३३ निर्णय 
11
हावभाव बघूनच एकमेकींना समजून घेतो; शेफालीने सांगितले स्मृतीसोबतच्या ताळमेळीचे रहस्य
12
हार्दिकची १८ कोटींची  पात्रता आहे का? : मूडी
13
राज्यात आज धडाडणार राजकीय तोफा; मोदी वाशिम-ठाण्यात तर राहुल गांधी कोल्हापुरात
14
भारताचा दारुण पराभव, न्यूझीलंडची विजयी सलामी
15
धारावी प्रकल्पातील अनधिकृत बांधकामांसंदर्भात समिती; न्या. दिलीप भोसले अध्यक्ष, सहा सदस्यही नेमले
16
समाज घटकांसाठी महामंडळे; मंत्रिमंडळ बैठकीत जैन, बारी, तेली समाजासाठी महत्त्वाचे निर्णय 
17
पंतप्रधानांच्या डोळ्यात धूळफेक, अपूर्ण योजनेचे उद्घाटन
18
एकीकडे इराण म्हणतोय युद्ध नकोय, दुसरीकडे म्हणतोय इस्रायलवर हल्ले करणारच 
19
मोदींचे ठरले! ९ वर्षांनी पाकच्या दौऱ्यावर जाणार भारताचे परराष्ट्रमंत्री; ‘एससीओ’ परिषदेत हाेणार सहभागी
20
निवडणुकीचे सूर उमटले वाद्यांच्या बाजारात; उलाढाल वाढली, राज्यातील उमेदवारांची खरेदीसाठी धाव 

NEET Exam Paper Leak: एटीएसने जप्त केलेला माेबाइल इरण्णाच्या मुलीचा !

By राजकुमार जोंधळे | Published: July 20, 2024 7:47 PM

एटीएसची दिशाभूल : चाैकशीत हाेतील खुलासे, सीबीआयला संशय

लातूर : ‘नीट’ गुणवाढीचे आमिष दाखवून विद्यार्थी - पालकांची फसवणूक केल्याप्रकरणी लातुरात चाैघांविराेधात गुन्हा दाखल असून, यातील तिघांना सीबीआयने अटक केली आहे, तर पसार इरण्णा काेनगलवार याने नांदेड येथील तपास पथकाचीच दिशाभूल केल्याचे समाेर आले. जप्त माेबाइल इरण्णाचा नसून ताे मुलीचा असल्याचे आढळून आले. या चाैकशीसाठी इरण्णाचा ताबा द्यावा, अशी विनंती सीबीआयने लातूर न्यायालयाकडे केली असून, न्यायालयाने शुक्रवारी अटकपूर्व जामीन अर्जावर निकाल राखून ठेवला आहे.

नांदेड एटीएसने गुणवाढीच्या संशयावरून लातुरातील दाेघा शिक्षकांसह इरण्णाला प्राथमिक चाैकशीसाठी २२ जून राेजी ताब्यात घेतले हाेते. चाैकशीनंतर साेडून दिले. दरम्यान, पथकाने शिक्षक, इरण्णाचे माेबाइल जप्त केले हाेते. माेबाइल तपासणीत नीट परीक्षेची प्रवेशवपत्रे आढळून आली. गुणवाढीच्या अनुषंगाने काही संदर्भ एटीएसच्या हाती लागले. त्यानंतर २३ जून राेजी शिवाजीनगर ठाण्यात चाैघांविरूद्ध गुन्हा दाखल केला. इरण्णाने एटीएसकडे दिलेला माेबाइल हा स्वत:चा नसून मुलीचा असल्याचे तपासात समाेर आले. त्याने तपास यंत्रणांचीच दिशाभूल केली असून, चाैकशीत अनेक धागेदाेरे हाती लागतील. शिक्षकाच्या माेबाइलमध्ये पालकांची नावे आढळली. त्याच्याही माेबाइलमध्ये ती आढळतील. यातून झालेले व्यवहार व इतर अनेक खुलासे हाेतील, असा संशय सीबीआयला आहे. दरम्यान, गंगाधरच्या काेठडीत शुक्रवारी १४ दिवसांची वाढ करण्यात आली.

लातूर न्यायालयातील घडामाेडी

सीबीआय वकिलाचा युक्तिवाद१) नीट गुणवाढीच्या गुन्ह्यात लातुरातील चाैघा आराेपींचा सहभाग असल्याचे समाेर आले. सीबीआयने तिघांची चाैकशी केली आहे.२) या चाैकशीत इरण्णा काेनगलवार याचा सहभाग असल्याचे दाेघा शिक्षकाच्या जबाबामध्ये नाेंदविण्यात आले आहे.३) त्याचा माेबाइल जप्त करायचा असून, माेबाइलमध्ये अनेक धागेदाेरे हाती लागतील. यासाठी चाैकशी करायची आहे.४) हे प्रकरण देशव्यापी असून, एफआयआरमध्ये नाेंदवलेल्या चाैथ्या आराेपींचा ताबा महत्त्वाचा आहे, असा युक्तिवाद लातूर न्यायालयात सीबीआयचे वकील मंगेश महिंद्रकर यांनी केला.

आराेपीच्या वकिलाचा युक्तिवाद१) गंगाधरनेच इरण्णाशी संपर्क केला. त्यालाही मुलीचे गुण वाढवून देताे, एमबीबीएसला प्रवेश मिळवून देताे, असे आमिष दाखविले.२) इरण्णा आमिषाला बळी पडला नाही. तसे असते तर मुलीला नीटमध्ये १६० गुण मिळाले नसते. यात त्यास फसविण्याचा प्रयत्न झाला आहे.३) जाधव, पठाण व गंगाधरच्या संपर्कात इरण्णा हाेता, हे खरे आहे. मात्र, जेव्हा लक्षात आले, हे लाेक गैरप्रकार करत आहेत. त्यावेळी ताे लांब राहिला.४) यात कुठलाही सहभाग नाही. २२ जून राेजी चाैकशीत सहकार्य केले. त्याला मधुमेह, रक्तदाब असून, अटकपूर्व जामीन द्यावा. गरज असेल तेव्हा सीबीआयला तपासात मदत केली जाईल, अशी बाजू वकील ए. पी. ताेतला यांनी मांडली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीneet exam paper leakनीट परीक्षा पेपर लीक