शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

NEET Exam Scam: तिघांचा जामीन लातूर न्यायालयाने फेटाळला, चाैथा आराेपी अद्यापही पसार

By राजकुमार जोंधळे | Published: September 10, 2024 11:36 AM

‘नीट’मध्ये गुण वाढवून देण्याचे आमिष दाखवून पालक-विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी लातुरात शिवाजीनगर ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल केला हाेता.

लातूर : ‘नीट’प्रकरणी न्यायालयीन काेठडीत असलेल्या तिघांचा जामीन लातूर न्यायालयाने साेमवारी फेटाळला. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून, आराेपींना जामीन देता येणार नाही, असे स्पष्टीकरण न्यायालयाने दिले आहे.

‘नीट’मध्ये गुण वाढवून देण्याचे आमिष दाखवून पालक-विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी लातुरात शिवाजीनगर ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल केला हाेता. दरम्यान, सीबीआयने जुलै महिन्यात म्होरक्या एन. गंगाधरअप्पा (रा. आंध्र प्रदेश) आणि संजय जाधव, जलील खाँ पठाण (रा. लातूर) याला अटक केली. चौथा आरोपी इरण्णा मष्णाजी कोनगलवार (रा. देगलूर, जि. नांदेड) अद्याप सीबीआयच्या हाती लागला नाही. त्याचा जामीन लातूर जिल्हा विशेष न्यायालयाने यापूर्वीच फेटाळला. त्याने अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली असून, सुनावणी सुरू आहे. लातूर कारागृहात असलेल्या एन. गंगाधरअप्पा, संजय जाधव, जलील खाँ पठाण याने वकिलामार्फत लातूर न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला हाेता. सुनावणीअंती न्यायालयाने साेमवारी तिघांचाही जामीन फेटाळला.

आरोपी म्हणाले, एकाही पालकाची फसवणूक नाही...आरोपी म्हणतात, या व्यवहारात त्यांना कसलाही आर्थिक फायदा झाला नाही. कोणत्याही पालकाने फसवणूक झाली म्हणून तक्रार दिली नाही. पालकाची तक्रार नसल्याने सरकार पक्षाच्या वतीने ‘एटीएस’ला तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही. संजय जाधव यांच्या वकिलाने युक्तिवाद केला, त्यांनी सर्व पैसे पालकांना परत केले. एन. गंगाधरअप्पा म्हणताे, गुन्ह्याशी कसलाही संबंध नाही. तर जलील खाँ पठाण याचे म्हणणे होते, मी आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक आहे. या नीट घोटाळ्यात सहभागी नाही.

सीबीआय म्हणते, सहभागाचे पुरावे...सीबीआयचे वकील मंगेश महिंद्रकर यांनी युक्तिवाद केला. यातील सर्व आरोपींचा एकमेकांशी संपर्क होता. त्यांनी सर्व पालकांना भेटून ‘नीट’ परीक्षेत गुण वाढवून देण्याचे काम करतो म्हणून ४० लाखांचा प्रति विद्यार्थ्यांमागे करार केला. अंदाजे प्रति विद्यार्थी दहा लाख रुपये घेतले. यात १६ विद्यार्थी निष्पन्न झाले. काही रक्कम रोख स्वरूपात घेतली, तर काही रक्कम नेट बँकिंगच्या माध्यमातून घेतली. सर्व आरोपींचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाला असून, त्यांनी पैसे घेतल्याचे उघड झाले आहे. आराेपींविराेधात भरपूर पुरावे उपलब्ध आहेत. त्यांना जामीन देऊ नये.

टॅग्स :neet exam paper leakनीट परीक्षा पेपर लीकlaturलातूरCrime Newsगुन्हेगारी