शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

Coronavirus : उदगीरच्या कोरोनाबाधित मृत महिलेच्या संपर्कातील १८ जणांचे अहवाल निगेटिव्ह; ८ प्रलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 7:21 AM

दरम्यान कोरोना बाधा पसरू नये म्हणून प्रशासन खबरदारी घेत आहे. उदगीरमध्ये  संचारबंदीचा अंमल कठोरपणे केला जात आहे.

लातूर : उदगीर येथील कोरोना बाधित मयत महिलेच्या संपर्कातील १८ जणांचे अहवाल रविवारी रात्री सव्वा बारा वाजता निगेटिव्ह आले आहेत. मात्र अद्यापि ८ अहवाल प्रलंबित आहेत. दरम्यान कोरोना बाधा पसरू नये म्हणून प्रशासन खबरदारी घेत आहे. उदगीरमध्ये  संचारबंदीचा अंमल कठोरपणे केला जात आहे.लातूर जिल्ह्यात यापूर्वी परराज्यातील ८ यात्रेकरू कोरोनामुक्त झाले. मात्र उदगीरमध्ये मधुमेह व अन्य आजार असणाऱ्या कोरोना बाधित ७० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली. त्यामुळे सदर महिलेच्या संपर्कातील २६ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत २६९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ९ बाधितांपैकी ८ कोरोनामुक्त झाले. एक बाधित वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. रविवारच्या तपासणीत लातूर शहरातील सर्व ७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले, तसेच चाकूरचाही एक अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ गिरीश ठाकूर यांनी दिली. उदगीरचे उर्वरित ८ अहवाल सोमवारी दुपार पर्यंत मिळतील असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी सांगितले. उदगीरकडे लक्ष...वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी उदगीरच्या स्थितीचा आढावा घेतला. महिलेच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन केले आहे. महिलेचे वास्तव्य असलेल्या परिसरातील अडीच हजार कुटुंबांची तपासणी सुरू केली आहे. पर्यावरण व पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे हे उदगीरमधील लोकप्रतिनिधी, डॉक्टरांशी सतत संपर्कात आहेत.  जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने यांनी लागण पसरू नये म्हणून लोकांना घराबाहेर पडू नका असे आवाहन केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस