शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

‘नाफेड’कडे तूर खरेदी शून्य; बाजारभावानुसार दर देऊनही शेतकरी धजावेनात

By हरी मोकाशे | Published: January 04, 2024 5:29 PM

गेल्या तीन वर्षांपासून खुल्या बाजारपेठेत तुरीचे दर वाढले आहेत. त्या तुलनेत नाफेडच्या हमीभाव खरेदी केंद्रावर कमी दर आहेत.

लातूर : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या आधारभूत किमतीपेक्षा खुल्या बाजारात तुरीला अधिक भाव असल्याने राज्य शासनाने यंदा ‘नाफेड’मार्फत बाजारभावानुसार तूर खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. तीन दिवस उलटले तरी एक रुपयाची खरेदी झाली नाही. त्यामुळे नाफेडच्या खरेदी केंद्रांवर तूर विक्रीसाठी शेतकरी धजावत नसल्याचे पाहावयास मिळत आहे.

गेल्या तीन वर्षांपासून खुल्या बाजारपेठेत तुरीचे दर वाढले आहेत. त्या तुलनेत नाफेडच्या हमीभाव खरेदी केंद्रावर कमी दर आहेत. परिणामी, शेतकऱ्यांनी खुल्या बाजारास पसंती दिली आहे. त्यामुळे आधारभूत किंमत योजनेंतर्गतच्या हमीभाव केंद्रावर तूर खरेदी झाली नाही. हे पाहून राज्य शासनाने यंदा प्रथमच बाजारभावानुसार तूर खरेदी करण्याचा निर्णय घेतला. तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन केले.

जिल्ह्यात खरिपात सर्वाधिक साडेचार लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला होता. त्यापाठोपाठ तुरीचा ६४ हजार ४६३ हेक्टरवर पेरा झाला होता. सध्या काही ठिकाणी तूर काढणी सुरू असून, शेतकरी बाजार समितीत विक्रीसाठी आणत आहेत.

२३ शेतकऱ्यांची विक्रीसाठी नोंदणीतूर विक्री नोंदणीसाठी ‘नाफेड’ने जिल्ह्यात सहा केंद्रांना मंजुरी दिली आहे. २२ डिसेंबरपासून विक्रीसाठी नोंदणी सुरू झाली आहे. आतापर्यंत औसा तालुक्यातील केंद्रावर १०, देवणी ३, लातूर ४, रेणापूर १ आणि सताळा (ता. अहमदपूर) येथील केंद्रावर ५ अशा एकूण २३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. दरम्यान, अद्यापही नोंदणी सुरूच असल्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी सांगितले.

तीन वर्षांपासून रुपयाची खरेदी नाही...गेल्या तीन वर्षांपासून नाफेडच्या हमीभाव खरेदी केंद्रावर एक रुपयाचीही तूर खरेदी झाली नाही. कारण, हमीभावापेक्षा खुल्या बाजारात तुरीला अधिक दर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.

वर्षाला तीनशे रुपयांची वाढ...वर्ष - हमीभाव२०२०-२१ - ६०००२०२१-२२ - ६३००२०२२-२३ - ६६००२०२३- २४ - ७०००

मुंबईहून कळणार दररोजचा भाव...यंदा प्रथमच बाजारभावानुसार तूर खरेदी होणार आहे. त्यासाठी नोंदणी सुरू झाली आहे. आतापर्यंत २३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. मात्र, तीन दिवसांत एकाही शेतकऱ्याने तूर विक्री केली नाही. दरम्यान, तुरीचा दररोजचा भाव हा नाफेडच्या मुंबई येथील कार्यालयातून कळविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा.-विलास सोमारे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी.

गरजेवेळी पैसे मिळण्यास अडचण...बाजारभावानुसार तूर खरेदी करण्याचा नाफेडचा उपक्रम चांगला आहे. त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना चार पैसे अधिक मिळतील. मात्र, हमीभाव केंद्रावर शेतमालाची विक्री केल्यानंतर काही दिवसांनी पैसे मिळतात. गरजेवेळी पैसे मिळत नाहीत. आर्थिक अडचणींतील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही. त्यामुळे अडचण होते.-विलास देशमाने, शेतकरी.

८ हजार ७०० रुपये सर्वसाधारण भाव...लातूर बाजार समितीत बुधवारी तुरीची १२ हजार १३१ क्विंटल आवक झाली होती. कमाल भाव ९ हजार २०० रुपये, किमान ७ हजार ९९९ रुपये, तर सर्वसाधारण ८ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीlaturलातूर