शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!
2
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
3
"मी ठासून सांगतोय माघार घेणार नाही"; वर्षा बंगल्यावरील भेटीनंतर सरवणकरांची स्पष्ट भूमिका
4
Maharashtra Election 2024: महाविकास आघाडीचा गेम बिघडवणार?; ११ बंडखोर कोण आहेत?
5
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
6
तरुणीचा व्हिडीओ कॉल उचलला आणि हनिट्रॅपमध्ये अडकले मंत्री, त्यानंतर घडलं असं काही...
7
Video - "RC, ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, पकडलं तर फक्त भाजपाची डायरी दाखवा, पोलीस..."
8
Gautam Adani News : अदानींनी नेमकं केलंय तरी काय? 'या' कंपनीच्या मागे का लागल्यात PNB, ICICI सारख्या बँका?
9
'सुंदर' चेंडू अन् 'कॉपी पेस्ट फॉर्म्युला'! टॉम लॅथमसह रचिन झाला क्लीन बोल्ड (VIDEO)
10
कार्तिक आर्यन-विद्या बालनचा 'भूल भूलैय्या ३' कसा आहे? पहिला Review आला समोर
11
ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी
12
IND vs NZ : भारताची आपल्या घरात 'कसोटी' तरी बुमराहला का विश्रांती? BCCI ने सांगितलं महत्त्वाचं कारण
13
गुरु-शुक्राचा राजयोग: ९ राशींना सुखकर, दिवाळीनंतरही लाभ; उत्पन्न वाढ, नवीन नोकरीची संधी!
14
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
15
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
16
भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या झाडल्या; दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या
17
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
18
अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याचं सांगताच मलायकाची पोस्ट, म्हणते - "एका क्षणासाठी..."
19
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
20
HDFC Bankची उपकंपनी HDB फायनान्शिअल सर्व्हिसेस आणणार IPO; 'इतके' हजार कोटी उभे करणार

लातूर शहरातील पूर्व भागात भूगर्भातून आवाज; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

By संदीप शिंदे | Published: February 15, 2023 2:55 PM

यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. या आवाजाची भूकंप मापक केंद्रात कोणतीही नोंद झालेली नाही.

लातूर : शहरातील पूर्व भागात बुधवारी सकाळी १०.३० ते १०.४५ वाजताच्या सुमारास भूगर्भातून आवाज आला. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. या आवाजाची भूकंप मापक केंद्रात कोणतीही नोंद झालेली नाही.

लातूर शहरातील पूर्व भागातील विवेकानंद चौक, साठफुटी रोड परिसरात बुधवारी सकाळी १०.३० ते १०.४५ वाजेच्या दरम्यान भूगर्भातून आवाज झाला. स्थानिक नागरिकांनी तात्काळ प्रशासन कळविले. दरम्यान, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने लातूर, औराद शहाजनी, आशिव येथील भूकंप मापक केंद्रावरून माहिती घेतली असता त्यावर कोणतीही नोंद झालेली नसल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी यांनी सांगितले. दरम्यान, भूगर्भातील हवेच्या पोकळीमुळे असा आवाज येत असल्याचा अंदाज आपत्ती व्यवस्थापन विभागाने वर्तविला आहे.

भूगर्भातून आवाजाची मालिका सुरूच...लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील हासोरी परिसरात मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात भूगर्भातून दोन ते तीन वेळेस आवाज झाला होता. तेव्हा दिल्लीच्या पथकाने पाहणी करून लातूर, आशिव, औराद शहाजानी येथे भूकंप मापक यंत्र बसविले आहेत. दरम्यान, याच महिन्यात ४ तारखेला निलंगा तालुक्यातील निटूर-डांगेवाडी परिसरातही भूगर्भातून आवाज आला होता. आता लातूर शहरातील पूर्व भागातही बुधवारी सकाळी भूगर्भातून आवाज आला आहे. 

टॅग्स :laturलातूरEarthपृथ्वी