अहमदपूर तालुक्यात जलस्रोतांची संख्या वाढली असून, सिंचनाचे क्षेत्रही वाढले आहे. त्यामुळे या भागात अधिक पाण्याची पिके घेतली जात आहेत. तालुक्यात उसाचे प्रमाण इतर पिकांच्या तुलनेत जास्त आहे. ज्या परिसरात ऊस क्षेत्र आहे तेथील बहुतांश शेतकरी साखर कारखान्याला आपला ऊस पाठवतात. मागील काही वर्षांपासून उसाच्या रसवंत्या सर्वत्र बहरत चालल्या आहेत. यातून रसवंतीचालकांकडून उसाची मोठी मागणी होत आहे. ऊसतोडणीला आल्यावर जागोजागी उसाच्या रसापासून गूळ तयार करणारे गुऱ्हाळ सुरु केले जात होते. गुऱ्हाळाचा आस्वाद घेण्यासाठी शेतकरी आपल्या पाहुण्यांना आमंत्रित करीत असत. गुऱ्हाळाची लगबग पाहावयास मिळत होती. एकीकडे मजुरांची सुरू असलेली ऊसतोडणी, दुसरीकडे चरकातून काढण्यात येणारा उसाचा रस, बाजूलाच पेटवलेली भट्टी, त्यात एकसारखे टाकण्यात येणारे पाचट, भट्टीवर टाकण्यात आलेली भली मोठी लोखंडी कढई, त्यात उसाचा रस आणि गूळ भेंडी ओतून अगदी उकळी फुटेपर्यंत कवच्याने हलवत सततपणे सुरू असलेले काम. उसाच्या रसाच्या आदणाने कढईत उकळी घेतली की समजा गूळ तयार झाला. उसाचे गुऱ्हाळ अहमदपूर तालुक्यातील हाडोळती शिवारात सुरू आहेत.
शेतकऱ्यांना ऊस लागवड केल्यानंतर
एका एकरमध्ये मध्ये २५ आदण निघत असून, एका आदणाला अडीच क्विंटल गूळ निघतो. तर एकरी सहा टन २.५० किलो गूूळ निघतो. गुऱ्हाळ परवडत असतानाही शेतकरी मात्र आपला ऊस कारखान्याला देऊन मोकळे होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
गुऱ्हाळातील गूळ उच्च प्रतिचा...
ऊस तोडणीसह गुऱ्हाळाच्या कामासाठी मजूर मिळत नाहीत. एकदा गुऱ्हाळ सुरू झाल्यावर ते बंद होऊ नये म्हणून मजुरी व्यतिरिक्त आगाऊ रक्कम मजुरांना द्यावी लागते. गुऱ्हाळात तयार होणारा गूळ शुद्ध आणि उच्च प्रतिचा असतो. त्यात कोणतीही रासायनिक प्रक्रिया केलेली नसते. त्यामुळे अशा गुळाला मोठी मागणी आहे. मात्र गुऱ्हाळांची संख्या रोडावल्याने बाजारात प्रक्रिया केलेल्या गुळाची विक्री होताना दिसत नाही.
- विश्वनाथ हेंगणे, शेतकरी