टीबीची लक्षणे...
सलग खोकला येणे, एक महिना सतत ताप येणे, वजन कमी होणे, भूक न लागणे, लघवीवाटे रक्त येणे, आदी क्षयरोगाची लक्षणे आहेत. अशा लक्षणाच्या रुग्णांनी तत्काळ दवाखान्यात दाखवून तपासणी करावी. टीबीचे निदान झाल्यास मोफत उपचार आहेत.
जास्तीत जास्त २८ महिन्यांत टीबीमुक्त...
क्षयरुग्णांची संख्या २०२५ पर्यंत कमी केली जाणार आहे. त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरून घरोघरी जाऊन तपासणी केली जात आहे. १ जुलै ते ३१ ऑक्टोबर आणि डिसेंबर ते मार्च या दोन टप्प्यांत ही मोहीम राहणार आहे. लक्षणे दिसणाऱ्या नागरिकांचे नमुने घेऊन तपासणी व एक्सरे काढून रोगनिदान केले जाणार आहे.
पोषण आहाराचे पैसे थेट रुग्णांच्या खात्यावर शासनाकडून जमा केले जातात. ४, ६ आणि १ वर्ष, २४ महिने या कालावधीचे उपचार आहेत. त्या कालावधीतील ५०० रुपये पोषण आहाराचे पैसे संबंधित रुग्णाच्या खात्यावर जमा केले जातात. जिल्ह्यात ८०० रुग्णांचे पैसे जमा केलेले आहेत. उर्वरित रुग्णांचे बँक खाते क्रमांक संकलित केले जात आहे. - डॉ. शिवाजी फुलारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी