शासकीय कार्यालयात पाच दिवसांचा आठवडा झाला असून, सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ पर्यंतची कार्यालयीन वेळ आहे. मात्र कोणीही वेळेवर येत नसल्याचे चित्र आहे. अनेकजण चाकूर शहर व तालुक्यात नोकरी करतात. मुक्कामी ३० ते ३५ कि. मी. दूर असलेले लातूर, अहमदपूर, उदगीर आदी ठिकाणी जातात. वास्तविकपणे जे घरभाडे उचलतात, त्यांनी मुख्यालयी असले पाहिजेत. असे न होता शासकीय, अधिकारी, कर्मचारी हे दररोज अप-डाऊन करतात. माध्यमिक शाळा सुरू झाल्या असून, प्राध्यापक, शिक्षक लातूर, अहमदपूर आदी ठिकाणांवरुन दररोज चाकूर व तालुक्यात ये-जा करतात. त्यांच्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढू शकतो. शासनाकडून मुख्यालयी राहण्याचे घरभाडे उचलून मुख्यालयी न राहता अप-डाऊन करणा-यांविरुध्द गुन्हे दाखल करावेत. आतापर्यंत उचललेले घरभाडे वसूल करून शासनाच्या तिजोरीत जमा करावे. यापुढे कोणी मुख्यालयी राहत नसेल, तर त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी. शिक्षकांना नोकरीच्या गावी मुख्यालयी राहण्याचे आदेश द्यावेत, असेही निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावर सुधाकरराव लोहारे, नारायण बेजगमवार, शिवलिंग गादगे, सागर होळदांडगे, अनिल महालिंगे, अजय धनेश्वर, अजित घंटेवाड, विश्वनाथ कांबळे, शिवकुमार सोनटक्के, दत्ता झांबरे आदींची नावे आहेत.
अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश द्यावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 4:13 AM