राजकुमार जाेंधळे / लातूर : साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहर्त असलेल्या अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर अनेकांनी साेन्या-चांदीच्या खरेदीचा याेग साधला. तर रिअर इस्टेट क्षेत्रात फ्लॅट, राे-हाउस आणि प्लाॅट खरेदीबराेबरच वाहन बाजारातही ग्राहकांची खेरीदसाठी माेठी र्गदी झाली हाेती. सराफा बाजार, रिअर इस्टेसह वाहन बाजारात शुक्रवारी काेट्यवधींच्या उलाढालीचा टप्पा गाठला आहे.
अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर अनेकांनी साेने खरेदीचा ‘सुवर्णयाेग’ साधला. सराफा बाजारात दिवभर साेन्या-चांदीचे दागिने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी केली हाेती. परिणामी, सराफा बाजारात काेट्यवधींची उलाढाल झाल्याचे सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले. इकडे वाहन, रिअर इस्टेत क्षेत्रातही अनेकांनी नवीन घर खरेदी करण्याचे स्वप्न अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर पूर्ण केले.
साेन्या-चांदी वधारली;दहा हाजरांची दरवाढ...
दिवाळीपासून साेन्या-चांदीच्या दरात उच्चांकी वाढ झाली. साेने प्रतिताेळा दहा हजारांनी वधारले तर चांदी प्रतिकिलाे किमान १५ हजारांनी वाधारली. विजयादशमीराेजी साेने ६१ हजार २०० रुपयांवर (जीएसटीसह) हाेते. तर चांदी ७४ हजार ४०० रुपयांवर (जीएसटीसह) हाेती. शुक्रवारी साेने प्रतिताेळा २४ कॅरेट साेने (जीएसटीसह) ७५ हजार ३०० रुपये, चांदी प्रतिकिलाे (जीएसटीसह) ८६ हजार ५२० रुपयांवर पाेहचली.
लातूर सराफा बाजारातखेदीसाठी ग्राहकांची गर्दी...
शुक्रवारी सकाळपासूनच लातुरातील सराफा दुकानात ग्राहकांची गर्दी दिसून आली. ७३ हजारांवर पाेहचलेल्या साेन्याच्या खरेदीचा उत्साह मात्र ग्राहकांच्या चेहऱ्यावर कायम असल्यचे चित्र दिसून आले. अनेकांनी साडेतीन मुहुर्तापैकी एक मुहुर्त म्हणून अक्षय तृतीयेला साेने-चांदी खरेदी केली.
ग्राहकांचा प्रतिसाद...
अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर अनेकांनी साेने-चांदी खरेदीला प्राधान्य दिले. भाववाढ असली तरी ग्राहकांचा खरेदीचा उत्साह कमी झाला नाही. दिवसभर सराफा बाजारात सकाळपासूनच खरेदीसाठी ग्राहकांची माेठी गर्दी हाेती. गुंतवणूक म्हणून अनेकांनी खरेदी केली. - महेश शिंदे बाकलीकर, सराफा
मुहुर्तावर साेनेखरेदी...
अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर अनेकांनी खरेदीचा सुवर्णयाेग साधला आहे. दरवाढ झाली तरी शुक्रवारी दिवसभर सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी हाेती. यातून काेट्यवधींची उलाढाल झाली असून, सर्वत्र खरेदीचा उत्साह दिसून आला. - सचिन शेंडे-पाटील, सराफा
५ वर्षात साेन्यात दुप्पट दरवाढ...
वर्ष साेने चांदी२०१९ - ३५,००० ४२,०००२०२० - ४८,६०० ५८,०००२०२१ - ४९,१३० ६०,०००२०२२ - ५१,८६० ६२,०००२०२३ - ६१,२०० ७४,०००२०२४ - ७३००० ८४,०००
(हे दर ३ टक्के जीएसटीविना आहेत़)