शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
2
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
3
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
4
"घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गंमतीदार किस्सा
5
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
6
‘लाडकी बहीण’ योजनेत पुन्हा गैरप्रकार समोर; ६ लाडक्या भावांचे अर्ज, ‘असा’ लागला शोध
7
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
8
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
9
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
10
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
11
इटलीच्या PM मेलोनी यांना डेट करताहेत इलॉन मस्क? चर्चांना उधाण, स्पष्टीकरण देत म्हणाले...  
12
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली
13
“ब्रिजभूषण सिंहचा एन्काउंटर का केला नाही, RSSच्या लोकांना वाचवायला अक्षय शिंदेला संपवले”
14
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
15
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात मोठी कारवाई! टीटीडीकडून 'या' डेअरीच्या विरोधात तक्रार दाखल
17
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
18
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
19
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
20
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स

कार पळविणाऱ्या टोळीतील एकास कारसह पुण्यातून उचलले 

By राजकुमार जोंधळे | Published: October 16, 2023 6:55 PM

लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

लातूर : शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून कार पळविणाऱ्या टोळीतील एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे येथून कारसह सोमवारी अटक केली आहे.

पोलिसांनी सांगितले, लतुरातील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून फियाट कंपनीची कार मध्यरात्री चोरट्याने लातूर- बार्शी जाणारे रोडवरून चोरून नेल्याची घटना ११ ऑक्टोबर रोजी घडली होती. याबाबत गुन्हा करण्यात आला होता. हा  गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आदेश दिले होते. त्यानुसार अपर पोलिस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या पथकाने आरोपीचा शोध सुरु केला. खबऱ्याकडून पथकाला माहिती मिळाली. त्यानुसार लातूर- बार्शी रोडवरुन चोरीला गेलेली कार पुणे येथील फुरसुंगी ते हडपसर रोडवर असून, एक व्यक्ती विक्री करण्याचा प्रयत्न करत आहे.

या माहितीनंतर पोलिस पथक फुरसुंगी येथे तातडीने पोहोचले. त्यांनी पाहणी केली असता गुन्ह्यात चोरीतील कार असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने त्या ठिकाणी सापळा लावला असता, थोड्याच वेळात त्या कारमध्ये बसताना एकाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव अरविंद बालाजी डावखरे (वय २१, रा. खुटवड चौक, फुरसुंगी ता. हवेली, जि. पुणे) असे असल्याचे सांगितले. ११ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री लातूर-बार्शी रोडवर पार्क केलेली कार चोरल्याचे कबूल केले. याप्रकरणात बालाजी डावखरे याला ताब्यात घेत कार जप्त केली. ही करवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, अमलदार राहुल सोनकांबळे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, मनोज खोसे, राम गवारे, शिंदे, चालक कुंभार, सायबर सेलचे पोलिस अमलदार गणेश साठे, शैलेश सुडे यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर