शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

लातूर जिल्हा पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर; आठ प्रकल्पांत केवळ २१ टक्के उपयुक्त जलसाठा

By हरी मोकाशे | Published: December 06, 2023 5:45 PM

लातूर जिल्ह्यात लवकरच पाणीटंचाईच्या झळा जाणवण्याची भीती प्रशासनाकडून व्यक्त होत आहे.

लातूर : गत पावसाळ्यात पावसाने वार्षिक सरासरीही न गाठल्याने जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पात अपेक्षित प्रमाणात जलसाठा झाला नाही. परिणामी, सध्या व्हटी आणि तिरु मध्यम प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा शून्य आहे तर उर्वरित सहा प्रकल्पांमध्ये केवळ २१.८४ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे जिल्ह्यात लवकरच पाणीटंचाईच्या झळा जाणवण्याची भीती प्रशासनाकडून व्यक्त होत आहे.

गत पावसाळ्यात उशिराने पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे खरीपाच्या पेरण्यांनाही विलंब झाला. दरम्यान, पिकांपुरता पाऊस झाल्याने खरीपातील पिके चांगली उगवली होती. परंतु, ऑगस्टमध्ये जवळपास महिन्यापेक्षा अधिक दिवस पावसाने ताण दिला. परिणामी, खरीप पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. शिवाय, जिल्ह्यातील प्रमुख नद्यांसह ओढे- नाले वाहिले नाहीत. त्याचबरोबर विहिर, कुपनलिकांमध्ये पाण्याचा संचय झाला नाही.

जिल्ह्यात दरवर्षी परतीचा पाऊस होतो. त्यामुळे यंदाही परतीचा पाऊस होईल, अशी शेतकऱ्यांसह प्रशासनाला अपेक्षा होती. परंतु, परतीच्या पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे आशेवर पाणी फिरले. परिणामी, पाणीटंचाईची भीती वाढू लागली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने यंदा लवकरच पाणीटंचाई जाणवेल, अशी भीती व्यक्त करीत संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार केला.

जलसाठा घटू लागल्याने चिंता...दिवसेंदिवस जलसाठ्यात घट होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला चिंता लागली आहे. सध्या तावरजा मध्यम प्रकल्पात ०.०६२ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. तसेच रेणापूर प्रकल्पात ४.०३८, देवर्जन- ३.४६९, साकोळ- ४.९२०, घरणी - ७.०१७, मसलगा- ७.१७० दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. व्हटी आणि तिरु मध्यम प्रकल्प जोत्याखाली आहेत. सध्या एकूण २६.६७६ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे.

तलावांमध्ये २२.९९ टक्के साठा...लघु पाटबंधारे विभागाअंतर्गत एकूण १३४ तलाव आहेत. या तलावात प्रत्यक्षात उपयुक्त जलसाठा ७२.२४६ दलघमी असून त्याची टक्केवारी २२.९९ टक्के अशी आहे. दरम्यान, दिवसेंदिवस जलसाठ्यात घट होत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून प्रकल्पातील पाण्याचा वापर शेतीसाठी करण्यात येऊ नये, अशा सूचना करण्यात येत आहेत.

प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित...जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. प्रकल्पातील पाण्याचा उपयोग शेती सिंचनासाठी करु नये म्हणून सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच तालुका प्रशासन व महावितरणने प्रकल्पावर लक्ष देऊन विद्युत मोटारींद्वारे पाण्याचा शेतीसाठी वापर होत असल्याचे आढळून आल्यास कारवाई करण्याच्या सूचनाही जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत.

मसलगा प्रकल्पात सर्वाधिक जलसाठा...प्रकल्प - उपयुक्त जलसाठा टक्केतावरजा - ०.३०व्हटी - ००रेणापूर - १९.६४तिरु - ००देवर्जन - ३२.४८साकोळ - ४४.९४घरणी - ३१.२३मसलगा - ५२.५३एकूण - २१.८४

टॅग्स :laturलातूरWaterपाणी