ज्या उमेदवारांना कोणत्याही व्यवसायात प्रवेश मिळाला नाही, त्यांना प्रवेशासाठी संपूर्ण जिल्ह्यातील शासकीय व खाजगी आयटीआयमध्ये रिक्त जागांवर प्रवेश देण्यासाठी जिल्हास्तर समुपदेशन फेरी होत आहे.
अर्ज केलेल्या उमेदवारांनी रिक्त जागेनुसार जिल्हा निवडणे २५ डिसेंबर रोजी सकाळी ८ पासून सुरू होणार आहे. जिल्हास्तरीय फेरीसाठी मेरीट लिस्ट व हजर राहण्यासाठी दिनांक व वेळ संदेशाद्वारे कळविले जाणार आहे. दिलेल्या दिनांकास व वेळेत जिल्हास्तरीय संस्थेत हजर राहून अलाऊटमेंट लेटर घेणे, तर ३० डिसेंबर रोजी मिळालेले पत्र संबंधित संस्थेत जमा करावे लागणार आहे. तसेच प्रमाणपत्र तपासून प्रवेश निश्चित करण्यासाठी २९ ते ३१ डिसेंबर या कालावधीत मुदत राहणार आहे. आयटीआय प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.