शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

लातूर जिल्ह्यातील अवकाळी नुकसानीचे पंचनामे पूर्ण; आता मदत केव्हा मिळणार?

By संदीप शिंदे | Published: April 03, 2023 5:10 PM

२२ हजार ५६५ बाधित शेतकरी : १० हजार ३६७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

लातूर : जिल्ह्यात मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीने रबीतील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाकडून पुर्ण करण्यात आले असून, याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे. जिल्ह्यातील २२ हजार ५६५ बाधित शेतकऱ्यांचे १० हजार ३६७ हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांच्या नजरा आता मदत केव्हा मिळणार याकडे लागले आहेत.

जिल्ह्यात मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीने रबी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा, करडई पिकांसह द्राक्ष, टरबूज, खरबुज, पपई, आंबे व भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर महसूल आणि कृषी विभागाकडून नुकसानीचे पंचनामे पुर्ण करण्यात आले आहेत. यात जिल्ह्यातील २२ हजार ५६५ शेतकऱ्यांचे १० हजार ३६७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यात जिरायती क्षेत्रावरील ८ हजार ६८२ हेक्टर, बागायतीचे १ हजार ७८ हेक्टर तर फळपिकांचे ५९७ हेक्टरवर नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाकडून पंचनाम्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे. यामुळे आता नुकसानीची मदत केव्हा मिळते याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

तालुकानिहाय बाधित शेतकरी संख्या...लातूर तालुक्यात १ हजार २७०, रेणापूर ५२७९, निलंगा ७६४७, शिरुर अनंताळ ५५२, देवणी ५५४६, उदगीर ३५५, जळकोट १८१९, अहमदपूर ३५ व चाकूर तालुक्यात ६२ असे एकूण २२ हजार ५६५ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक शेतकरी संख्या निलंगा तालुक्यात आहे. जिल्ह्यातील केवळ औसा तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपीटीने नुकसान झालेले नाही.

तालुकानिहाय पीक नुकसानीचे क्षेत्र...जिल्ह्यात सर्वाधिक निलंगा तालुक्यात ४ हजार २३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर लातूर तालुक्यात ५५६ हेक्टर, रेणापूर २२११, शिरुर अनंताळ १४७, देवणी २ हजार ४६५, उदगीर १४१, जळकोट ७७३, अहमदपूर १७ व चाकूर तालुक्यात ३१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, प्रशासनाकडून नुकसानग्रस्त शेतकरी आणि बाधित क्षेत्राचे पंचनामे पुर्ण करुन अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

नुकसानीमध्ये जिरायत क्षेत्र सर्वाधिक...अवकाळी पाऊस व गारपीटीने सर्वाधिक ८ हजार ६९२ हेक्टरवरील जिरायती क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर १ हजार ७८ हेक्टरवरील बागायती क्षेत्राला फटका बसला आहे. तसेच ५९७ हेक्टरवरील फळपिकांची नासाडी अवकाळी पाऊस व गारपीटीने केली आहे. नुकसानीचे पंचनामे पुर्ण झाल्याने मदत केव्हा मिळणार याकडे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीlaturलातूर