शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

औरादच्या बसस्थानकात बसने प्रवाशाला चिरडले; चालकाविरुद्ध पाेलीस ठाण्यात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 5:54 PM

औराद स्थानकात मोठ्या प्रमाणात गिट्टी उघडी पडली असून, मोठमोठे खड्डे पडले आहेत. अशा स्थितीत स्थानक परिसरात प्रवाशांना धड चालताही येत नाही.

औराद शहाजानी : बसने चिरडल्याने व्यंकट बळीराम कांबळे (वय ८३) हा प्रवासी ठार झाल्याची घटना औराद शहाजानी येथील बसस्थानक परिसरात शुक्रवारी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास घडली.

पाेलिसांनी सांगितले, निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी बसस्थानकात सकाळी निलंगा-औराद शहाजानी-हुलसूर बस (एम.एच. २० बी.एल. ३८३७) निघाली हाेती. दरम्यान, व्यंकट कांबळे या प्रवाशाच्या अंगावरून बसचे टायर गेल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने औराद शहाजानी येथील आराेग्य प्राथमिक केंद्रात दाखल केले असता, त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. डाॅक्टरांनी त्यांना तपासून मृत घाेषित केले. मृतदेहाचे शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील पोतदार यांनी केले. याबाबत औराद पाेलीस ठाण्यात दिगंबर व्यंकट कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून बसचालक शिवराज हत्तरगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जनार्दन काळे हे करीत आहेत.

स्थानक नियंत्रकांनी दिली घटनास्थळी भेटनिलंगा येथील स्थानक नियंत्रक अनिल बिडवे यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. मयताच्या नातेवाईकांना महामंडळाच्या वतीने दहा हजारांचा मदत निधी दिला. औराद स्थानकात मोठ्या प्रमाणात गिट्टी उघडी पडली असून, मोठमोठे खड्डे पडले आहेत. अशा स्थितीत स्थानक परिसरात प्रवाशांना धड चालताही येत नाही. जीव मुठीत घेऊन प्रवाशांना वावरावे लागते. याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे.

टॅग्स :Accidentअपघातlaturलातूर