कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने दुकानांसाठी काही नियम लागू केले आहेत. मात्र, त्या नियमांचे उल्लंघन करीत एका साडी सेंटर चालकाने दुकान उघडे ठेवले. त्यामुळे उपविभागीय अधिकारी, पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाने कारवाई करीत १० हजारांचा दंड वसूल केला, तसेच दोन किराणा दुकान, एक भुसार दुकान आणि एका भांडी दुकानावर कारवाई करीत प्रत्येकी २ हजारांचा दंड वसूल केला. एकूण १८ हजारांचा दंड वसूल करण्यात येऊन सदरील दुकानदारांना नोटीस देण्यात आली. ही कारवाई उपविभागीय अधिकारी विकास माने, पोलीस उपनिरीक्षक प्रणिता गायकवाड, पोकॉ. नागटिळक, महिला पोलीस कर्मचारी येलकटे, मुळे, तसेच नगरपालिका कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे केली. सर्वांनी नियमाचे पालन करावे. विनाकारण गर्दी करणे टाळावे. अत्यावश्यक सेवेतील दुकानदारांनी स्वतः मास्क वापरावा, तसेच ग्राहकांनाही मास्क असल्याशिवाय वस्तूची विक्री करू नये. फिजिकल डिस्टन्स राखावा, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक प्रणिता गायकवाड यांनी केले.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 4:20 AM