परिविक्षा अधिकारी जितन रहमान यांनी विद्यार्थ्यांना वेळेचे महत्व, स्पर्धा परीक्षेसाठी करावयाची तयारी, कोणत्या परीक्षा कशा पद्धतीने असतात याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
संस्थेचे सचिव ॲड. फारूख शेख यांनी प्रास्ताविकेत संस्थेच्या वतीने मागील वर्षभरापासून अभ्यास केंद्राची तयारी सुरू होती. उर्दू भाषेत शिकणारे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी तयार झाले पाहिजेत. अल्पसंख्यांक समाजात स्पर्धा परीक्षा विषयी आत्मविश्वास वाढावा हा या अभ्यास केंद्राचा उद्देश असल्याचे सांगितले.
शाळा परिसरात वृक्षारोपण...
हरजत सुरत शहा उर्दू शाळेच्या परिसरात परीविक्षा अधिकारी जितन रहमान यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. प्रारंभी संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन मुस्तफा सय्यद यांनी केले. फरहाना शेख यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.