घरात पैसे देत नसल्याने मारहाण
लातूर : तू घरात पैसे देत नाहीस म्हणून लाथा-बुक्क्याने मारहाण तसेच शिवीगाळ करीत दगडाने डोक्यात मारून जखमी केल्याची घटना मुरुड येथे घडली. याबाबत व्यंकट हनुमंत चव्हाण (रा. पारु नगर, मुरुड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विक्रांत व्यंकट चव्हाण व अन्य दोघांविरुद्ध मुरुड पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोना. शेंद्रे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, विक्रांत व्यंकट चव्हाण (रा. पारु नगर, मुरुड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून व्यंकट हनुमंत चव्हाण व अन्य तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गुंफावाडी शिवारात दुचाकीची धडक
लातूर : गुंफावाडी शिवारात भरधाव वेगातील एमएच २५ एक्यू ३१०१ या क्रमांकाच्या दुचाकी चालकाने फिर्यादी विष्णू बबन महानवर यांना जोराची धडक दिली. यात ते जखमी झाले. याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमएच २५ एक्यू ३१०१ या क्रमांकाच्या दुचाकी चालकाविरुद्ध मुरुड पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
टॉवरमधील बॅटऱ्यांची चोरी
लातूर : अहमदपूर तालुक्यातील खंडाळा येथे एका कंपनीच्या टॉवरच्या ऑफिसमधील बॅटरी बॅकअपचे तसेच अन्य साहित्याची चोरी झाली. याबाबत गणेश वैजनाथ जाधव (रा. तांदुळवाडी, ता. पालम जि. परभणी ह.मु. अहमदपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध किनगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
रेल्वे स्टेशन रोड येथून दुचाकीची चोरी
लातूर : रेल्वे स्टेशन रोड उदगीर येथून एमएच २४ एके ३४१४ या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना घडली. याबाबत प्रशांत विश्वनाथ भाटो (रा. शिवनगर, उदगीर) यांनी उदगीर शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोना. दळवी करीत आहेत.
मोबाईल फेकून दिल्याने मारहाण
लातूर : तुझा मोबाईल फेकून दिला, असे सांगितल्याच्या कारणावरून जयनगर येथे एकास शिवीगाळ करून लाथा-बुक्क्याने मारहाण झाल्याची घटना घडली. डोक्यात लोखंडी घागर मारून जखमी केले. याबाबत मरिबा दिलीप गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुर्गेश बालाजी पाटोळे याच्याविरुद्ध विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सपोफौ. सय्यद करीत आहेत.
टिप्परची ट्रकला धडक; गुन्हा दाखल
लातूर : अंबाजोगाई ते लातूररोडवर बोरवटी नजिक एमएच २४ एबी ९७०७ या क्रमांकाच्या टिप्पर चालकाने हयगयीने वाहन चालवून एमएच १८ एबी ५३७१ या क्रमांकाच्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. यात अंदाजे १० हजार रुपयांचे नुकसान झाले. याबाबत महादेव बन्सीलाल झुंजे (रा. अमरदास बाबा रोड, मुल्ला गल्ली, रिसोड जि. वाशीम) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमएच २४ एबी ९७०७ या क्रमांकाच्या टिप्पर चालकाविरुद्ध लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सपोफौ. पांढरे करीत आहेत.