लातूर : संपत्तीच्या वाटणीवरून आई-वडिलांना नारळ पाण्यातून विष दिलेल्या ज्ञानदीप कोटंबे याला मंगळवारी न्यायालयीन कोठडी मिळाली. उपचारावेळी ज्ञानदीपचे वडील निवृत्त प्राचार्य साधुराम कोटंबे (७२) यांचा मृत्यू झाला.ज्ञानदीपने वडील साधुराम व आई गयाबाई यांना थकवा दूर होईल म्हणून नारळ पाणी दिले होते. त्यात त्याने विष टाकले होते. ज्ञानदीपवर खून करणे, खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
जन्मदात्यांवर विषप्रयोग; तरुणाला न्यायालयीन कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 5:37 AM