लातूर: आईला सतत मारझाेड करणाऱ्या वडिलांचा पाेटच्याच मुलाने चाकूने भाेसकून, सपासप वार करत खून केल्याची खळबळजनक घटना लातुरातील रेणुका नगरात घडली हाेती. दरम्यान, आराेपी मुलाला पाेलिसांनी अटक करून लातूरच्या न्यायालयात मंगळवारी हजर केले असता, न्यायालयाने दाेन दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातुरातील आंबाजाेगाई राेडवरील आंबा हनुमान मंदिराच्या पाठीमागे रेणुका नगरात जानकर यांच्या घरी भाड्याने क्षीरसागर कुटुंब राहत हाेते. दरम्यान, फिर्यादी मंगल क्षीरसागर (वय ४३) यांना पती साेमनाथ मधुकर क्षीरसागर (वय ४५) हा सतत मारझाेड करीत हाेता. शनिवारी त्याने पत्नीला मारहाण सुरू केली. यावेळी तेवीस वर्षीय मुलगा राेहित हा घरातच हाेता. आईला पित्याकडून सतत हाेणाऱ्या मारझाेडीला ताे वैतागला हाेता. मारहाण सुरू असताना त्याने साेडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, वडील ऐकत नाहीत असे लक्षात आले. राेहितचा रागही अनावर झाला आणि त्याने घरातील चाकू हातात घेत जन्मदात्याला भाेसकले. शिवाय, सपासप वार केले. यात साेमनाथ मधुकर क्षीरसागर यांचा मृत्यू झाला.
याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात मंगल क्षीरसागर यांच्या तक्रारीवरुन मुलगा राेहित क्षीरसागर याच्याविराेधात खुनाचा गुन्हा दाखल केला हाेता. दरम्यान, पाेलिसांनी आराेपी मुलाला अटक केली. त्याला लातूरच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दाेन दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली आहे. अशी माहिती तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक संदीप कराड यांनी दिली.