शहरं
Join us  
Trending Stories
1
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
2
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
3
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
5
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
6
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
8
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
9
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
10
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
11
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
12
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
13
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
14
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
15
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
16
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
18
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
19
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
20
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल

पोलिसांनी दुचाकींसह तिघांना उचलले; आठ गुन्ह्यांचा लागला छडा !

By राजकुमार जोंधळे | Published: November 19, 2022 6:31 PM

स्थागुशाची कारवाई : चार माेबाइलसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

लातूर : शहरातील गांधी चाैक, एमआयडीसी आणि जिल्ह्यात रेणापूर, चाकूर पाेलिस ठाण्यांच्या हद्दीतून माेटारसायकलींची चाेरी करणाऱ्या टाेळीतील तिघांना लातुरात वेगवेगळ्या भागातून स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने उचलले. त्यांच्याकडून आठ दुचाकी, चार माेबाइल असा एकूण ३ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, आठ गुन्ह्यांचा छडा लावण्यात पाेलिसांना यश आले आहे.

पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून माेठ्या प्रमाणावर दुचाकी चाेरी, माेबाइल पळविणे, घरफाेडी आणि इतर गुन्ह्यांमध्ये माेठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. यातील चाेरट्यांचा शाेध घेण्याचे आदेश पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि त्या-त्या पाेलिस ठाण्यांना दिले हाेते. दरम्यान, चाेरट्यांचा शाेध घेत असताना, १८ नाेव्हेंबर राेजी शिवाजीनगर ठाण्यात दाखल गुन्ह्यातील चाेरीची दुचाकी घेऊन संशयित आराेपी खाडगाव परिसरात फिरत आहेत. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला खबऱ्याने दिली.

खबऱ्याच्या टीपने फुटले बिंग...खबऱ्याने दिलेल्या टीपनुसार एका संशयिताला तातडीने ताब्यात घेतले. अधिक चाैकशी, झाडाझडती घेतली असता त्याने अविनाश धनाजी चव्हाण (वय २३, रा. संभाजीनगर, खाडगाव रोड, लातूर) असे आपले नाव सांगितले. आपल्या साथीदाराच्या मदतीने लातुरात विविध ठिकाणांहून दुचाकी चाेरल्याची कबुली दिली. या माहितीनुसार राहुल बब्रुवान शेंडगे (वय २८, रा. समर्थ सोसायटी, लातूर) आणि महेश देविदास सरवदे (वय २१, रा. भोईगल्ली, लातूर) यालाही ताब्यात घेण्यात आले.

विविध गुन्ह्यांची दिली कबुली...ताब्यात असलेल्या तिघांची अधिक चाैकशी केली असता, त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली आहे. चाेरीतील आठ दुचाकी, चार मोबाइल असा ३ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शिवाजी नगर हद्दीतून - ३ , एमआयडीसी भागातून - २, रेणापूर - १, चाकूर - १ आणि गांधी चौक पाेलिस ठाण्याच्या हद्दीतून १ असे असे आठ गुन्हे उघडकीस आले आहेत. अटकेतील आरोपींना शिवाजीनगर ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

यांच्या पथकाने केली कामगिरी...ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे, सहायक पोलिस निरीक्षक राहुल बहुरे, पोलिस उपनिरीक्षक शैलेश जाधव, योगेश गायकवाड, तुराब पठाण, राम गवारे, सुधीर कोळसुरे, सिद्धेश्वर जाधव, प्रमोद तरडे, नाना भोंग, मोहन सुरवसे, राजेश कंचे, रवी कानगुले, नितीन कठारे, संतोष खांडेकर, प्रदीप चोपणे यांच्या पथकाने केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर