- राजकुमार जाेंधळे लातूर - हलगरा पाटीवर (ता. निलंगा) येथे पाेलिस पथकाने छापा मारून ३ लाख ६३ हजारांचा गुटखा जप्त केला आहे. याबाबत औराद शहाजानी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, एकाला अटक केली आहे.
पाेलिसांनी सांगितले, हलगरा पाटीवर येथे गुटखा विक्री केली जात असल्याची माहिती प्रशिक्षणार्थी डीवायएसपी राजश्री तेरणी-पाटील यांना मिळाली. या माहितीच्या आधारे शुक्रवारी सायंकाळी त्यांनी छापा मारला. यावेळी घरासह हॉटेलमध्ये अनेक पोत्यात भरून ठेवलेला गुटखा, पान मसाला हाती लागला. यावेळी ३ लाख ६३ हजार ३३२ रुपयांचा गुटखा जप्त केला असून, फारूक मदार मुल्ला (रा. हलगरा पाटी) याला अटक केली आहे. याबाबत औराद शहाजानी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
औराद परिसरात मटका-गुटखाही सुसाट औराद परिसरात माेठ्या प्रमाणावर मटका, गुटख्यासह इतर अवैध व्यवसाय राजराेजपणे सुरू असून, याकडे स्थानिक पाेलिसांनी दुर्लक्ष हाेत आहे. यापूर्वीही तांबाळा येथे पाेलिसांनी छापा मारला हाेता. राजरोसपणेपणे सुरू असलेल्या अवैध व्यवसायाला नेमके काेणाचे पाठबळ मिळत आहे? अशी चर्चा आहे.