शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
2
"145 उमेदवार उभे केले म्हणजे..."; रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना खोचक टोला
3
"ते खटा-खट म्हणत राहिले, आम्ही महिलांच्या खात्यात पटापट पैसे टाकले"; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला
4
बंद पडलेल्या जेट एअरवेजची मालमत्ता विकण्याचे आदेश; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
5
सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊतांना म्हणाले, "कितीही साबण, शाम्पू लावला तरी..."
6
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
7
इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदारसंघ : चौरंगी लढतीत कोण निवडून येणार राव?
8
सरकारी भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत,सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
9
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
10
नवरा बायकोचं भांडण, एका 'OK' नं रेल्वेला ३ कोटींचा फटका; कोर्टातील अजब प्रकरण काय?
11
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
12
Shah Rukh Khan :"जीव वाचवायचा असेल तर कोट्यवधी रुपये द्या, अन्यथा..."; सलमाननंतर शाहरुख खानला धमकी
13
"मला धमकावलं जातंय...", साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन
14
Girnar Parikrama 2024: 'या' पाच दिवसांतच गिरनारच्या जंगलात मिळतो प्रवेश; जेवढ्या यातना तेवढाच आनंद!
15
शरद पवारांवरील टीका 'मानसपुत्रा'च्या जिव्हारी; निषेध व्यक्त करत वळसे पाटलांनी खोतांना दिला इशारा
16
सदाभाऊंना कुत्रा म्हणणाऱ्या संजय राऊतांना नितेश राणेंनी दिली अशी उपमा, म्हणाले... 
17
विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का? अजित पवारांचे सूचक विधान
18
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
19
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
20
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...

राजकीय खलबते... गुडघ्याला बाशिंग...

By admin | Published: July 08, 2016 12:25 AM

राम तत्तापुरे , अहमदपूर प्रशासनाने प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर करताच अहमदपुरात निवडणुकीचे वारे जोमाने फिरू लागले आहेत. अहमदपूर नगरपालिकेत निवडणुकीचा बिगूल वाजताच

राम तत्तापुरे , अहमदपूरप्रशासनाने प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर करताच अहमदपुरात निवडणुकीचे वारे जोमाने फिरू लागले आहेत. अहमदपूर नगरपालिकेत निवडणुकीचा बिगूल वाजताच इच्छुक उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. आपल्या हक्काचा आणि सोयीचा प्रभाग शोधण्यासाठी आणि आपले बस्तान बसविण्यासाठी संभाव्य उमेदवार आडाखे बांधत आहेत.अहमदपूर शहरातील प्रमुख राजकीय पक्षांनीही आरक्षणानुसार उमेदवाराची चाचपणी सुरू केलेली आहे. तथापि, यावेळची निवडणूक ही कोणत्याही पक्षासाठी परीक्षाच ठरणारी आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस, सेना, भाजपा की आ. विनायकराव पाटील मित्रमंडळाचा झेंडा यंदा अहमदपूर नगरपालिकेवर फडकेल हे येत्या काळातच ठरणार आहे. अहमदपूर नगरपालिकेची स्थापना १९५२ साली झाली. पहिले नगराध्यक्ष होण्याचा मान अ‍ॅड. महालिंगप्पा सांगलीकर यांना मिळाला होता. नगरपालिकेच्या प्रारंभीच्या काळात काँग्रेस पक्षाचे वर्चस्व होते. त्यानंतरच्या काळात संमिश्र पक्षाचे वर्चस्व सिद्ध झाल्याचे दिसून येते. गेल्या दोन वर्षात काँग्रेस आणि भाजपा यांच्यामध्ये अत्यंत चुरशीच्या लढती होऊन त्यात भाजप उमेदवाराच्या गळ्यात विजयश्रीची माळ पडल्याचे चित्र होते. गतवेळी झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण पाच प्रभाग होते. त्यात २० नगरसेवक होते. सुरुवातीच्या नगराध्यक्षा ओबीसी प्रवर्गातून राखीव असलेल्या महिला सुशीलाबाई चौधरी विराजमान झाल्या होत्या. त्यानंतर आ. विनायकराव पाटील मित्रमंडळाच्या पाठिंब्याने खुल्या प्रवर्गातून ललिता पुणे नगराध्यक्ष बनल्या. यावेळी होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणूक ही थेट जनतेतून अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेतून असल्याने त्यानुसार अहमदपूर नगरपालिकेचे आरक्षणही ठरलेले आहे. नवीन बदललेल्या आरक्षणानुसार ११ प्रभाग असून एकूण २३ नगरसेवक राहणार आहेत. त्यात १२ जागा महिलांसाठी असून ११ पुरुष (खुला) आहेत. एस.सी. प्रवर्गासाठी ३ जागा, ओबीसी प्रवर्गासाठी ६ तर सर्वसाधारणसाठी ४ असे आरक्षण यंदा करण्यात आले आहे. खरे म्हणजे नगराध्यक्षाचे पद खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्याने तालुक्यातील प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी आणि पुढाऱ्यांनी या जागेकडे लक्ष केंद्रित केले आहे. विद्यमान आमदार विनायकराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, भाजपाचे प्रवक्ते गणेश हाके, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, शिवसेनेचे बालाजी रेड्डी, सेना तालुका प्रमुख प्रदीप चौकटे, रिपाइंचे बाबासाहेब कांबळे यांच्यासह विविध पक्षाच्या पुढारी विविध राजकीय आखाडे बांधत आहेत.सध्या नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने सांब महाजन, उपनगराध्यक्ष कालीमोदिन अहमद, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेता अभय मिरकले, मुजीब पटेल, भाजपाच्या वतीने अ‍ॅड. भारत चामे आणि बालाजी रेड्डी, अपक्ष सय्यद साजीद यांच्या नावांची चर्चा असली, तरी एका मोठ्या पक्षाकडून उमेदवार न मिळाल्यास आ. विनायकराव पाटील यांच्याशी घरोबा करण्याची शक्यता आहे.