लातूर : २७ व २८ फेब्रुवारी रोजी लातूर शहरातील बाभळगाव नाका रिंग रोड परिसरात होत असलेल्या जिल्हास्तरीय ‘इज्तेमा’ची जय्यत तयारी करण्यात आली असून, एकूण ३५ एकरांवर इज्तेमा होत आहे. गेल्या एक महिन्यापासून इज्तेमाची दोनशे स्वयंसेवकांकडून रात्रं-दिवस करण्यात आली आहे. सोमवार व मंगळवार असे दोन दिवस होणाऱ्या इज्तेमात धर्मगुरुंकडून मार्गदर्शन होणार आहे. बाभळगाव नाका परिसरातील क्रिसेंट इंग्रजी शाळेच्या परिसरात असलेल्या ३५ एकरांवर आजपासून इज्तेमा होणार आहे. चारशे बाय पाचशे ब्रासचा भव्य शामियाना उभारण्यात आला आहे. खुर्च्या, ध्वनीक्षेपक, पंखे, लाईट, जनरेटर, पिण्याच्या पाण्याचे १२०० नळ, तीन वजूखाने, ५०५ स्वच्छतागृहे, स्नानगृहांची उभारणी, पाण्यासाठी टँक उभारण्यात आले आहेत. शिवाय, १८ टँकरची व्यवस्थाही करण्यात आली आहे. इज्तेमा परिसरात दहा ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सहा ठिकाणी शाकाहरी भोजनगृह उभारण्यात आले आहेत. चहा, नाश्त्यासाठी दोनशे हॉटेल्सचे स्टॉल राहणार आहेत. प्राथमिक उपचार केंद्राची व्यवस्था, दुचाकी, चारचाकी वाहनांच्या पार्किंगची सोय ही स्वतंत्रपणे करण्यात आली आहे.
जिल्हास्तरीय ‘इज्तेमा’ची जय्यत तयारी; ३५ एकरांवर शामियाना
By admin | Published: February 27, 2017 12:34 AM