अध्यक्षस्थानी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नारायणराव देशमुख होते. यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मोहन अभंगे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मंगेश शिंदे, पोलीस निरीक्षक गोरख दिवे, पत्रकार विठ्ठल कटके, सिद्धार्थ चव्हाण, पंचायत समितीचे ओ. एस. पाटील यांची उपस्थिती होती.
यावेळी डॉ. देशमुख म्हणाले, कौटुंबिक गाडा सांभाळून आशा स्वयंसेविका तुटपुंज्या मानधनावर कार्य करीत आहेत. कोरोनाच्या संकटाच्या कालावधीत स्वत:चा जीव धोक्यात घालून आशा स्वयंसेविकांनी आरोग्य सेवा दिली. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेणे आवश्यक आहे. यावेळी गटविकास अधिकारी मोहन अभंगे, पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांनीही मनोगत व्यक्त केले.
विविध स्पर्धा, सत्कार...
यावेळी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा स्वयंसेविका रंजना पनगुले, लता कांबळे, मनीषा खडकीकर, गजेश्री कोपनबैने, अर्चना मुंडे, हेमा खोबरे, राधिका कटके, पंचशीला चक्रे, अलीमुन शेख, पुष्पा ढेगळे, आम्रपाली कांबळे, कल्पना मस्के, किरण इंगोले, रेखा जाधव, सुरेखा गिरी, सुनीता फड, गटप्रवर्तक प्रणिता नलाबले, ज्योती जगतकर, अनिता केंद्रे, मनीषा ढवण, महानंदा गायकवाड, शिवनंदा गव्हाणे, जयश्री थोरमोटे, वैशाली कणसे यांचा गौरव करण्यात आला.